Aaditya Thackeray : राज्य घटनेची प्रत दाखवत कुणाल कामराचं शिवसेनेला सडेतोड उत्तर; भ्याड टोळीचा हल्ला, आदित्य ठाकरेही भडकले

Aaditya Thackeray On Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी कलाकार कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणे केल्याने नवा वाद सुरू झाला असून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कमरावर गुन्हा दाखल झाला असून शिवसेनेनं त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे.
Aaditya Thackeray And Eknath shinde
Aaditya Thackeray And Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून कार्यकर्त्यांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिंदे यांच्या शिवसेनेसह शिंदेवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी X वर एक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर देवेंद्रजी... तुम्ही एक कमकुवत गृहमंत्री आहात, असा टोला लगावला आहे. असाच घणाघात आदित्य ठाकरे यांनी देखील केला असून त्यांनी कामरा यांचे विधान 100 टक्के खरे असल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कॉमेडियन कुणाल कामराने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याने शिंदेंवर एक गाणे सादर केले. ज्यामुळे युवा सेनेच्या सदस्यांनी कामरा यांच्या विरोधात निदर्शने केली आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्याबाहेर त्याचे फोटो जाळले. तसेच त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली.

यानंतर आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर एस्कवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी मिंधेच्या भ्याड टोळीने कॉमेडी शोचा स्टेज तोडला. जिथे विनोदी कलाकार @kunalkamra88 ने एकनाथ मिंधे वर एक गाणे सादर केले जे 100 % खरे आहे. एखाद्याच्या गाण्यावर अशा पद्धतीने असुरक्षित असणाराच भ्याड हल्ला करू शकतो आपली प्रतिक्रिया देऊ शकतो, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Aaditya Thackeray And Eknath shinde
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

तसेच आदित्य ठाकरे यांनी, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे का? असा सवाल करताना, एकनाथ मिंधे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याचा घणाघात केला आहे.

दरम्यान झालेल्या कारवाई आणि शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीनंतर कुणाल कामरा याने आपल्या सोशल साईड एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने एका हातात संविधान घेतलं असून त्यावर पुढे जाण्याचा एकमेव मार्ग... असं लिहलं आहे. सध्या त्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Aaditya Thackeray And Eknath shinde
Aaditya Thackeray : 'हमारे पास राऊत ब्रदर्स है’;आदित्य ठाकरेंकडून राऊत बंधूंचे कौतुक

कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत 'देशद्रोही' म्हटल्यावरून वाद उसळला असून त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. या प्रकरणी खार पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल सरमळकर, राहुल कनाल सह शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांवर 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com