Aaditya Thackeray : 'हमारे पास राऊत ब्रदर्स है’;आदित्य ठाकरेंकडून राऊत बंधूंचे कौतुक

Shivsena UBT Nirdhar Shibir : हातात कुठलंही शासकीय पद नसताना, मंत्रिपद नसतानाही जो काही वट संजयकाकांनी दिल्लीत निर्माण केला आहे ना, तो बघण्यासारखा आहे. तुम्ही आवर्जून दिल्लीत जावा आणि संजय राऊतांबरोबर फिरा, असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला.
Aaditya Thackeray-Sanjay Raut-Sunil Raut
Aaditya Thackeray-Sanjay Raut-Sunil RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 09 March : क्रिकेट म्हटल्यानंतर ठराविक बंधूंच आठवण येते. ऑस्ट्रेलियन संघात स्टिव्ह वॉ आणि मार्क वॉ हे दोन बंधू होते. तसेच, आपल्याकडे दोन बंधू आहेत, एक आमदार सुनील राऊत आहेत आणि दुसऱ्याचे (संजय राऊत) नाव सांगण्याची गरजच नाही, असे सांगून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील निर्धार मेळाव्यात बोलताना ‘हमारे पास मॉं है’ या डायलॉगची आठवण करून दिली.

मुंबईत शिवसैनिकांसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दिवाकर रावते, सुभाष देसाई या जुन्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्याचपद्धतीने आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आपल्या भाषणातून शिवसैनिकांना टॉनिक देण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, क्रिकेट म्हटल्यानंतर ठराविक बंधूंची आठवण येते. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोघे भाऊ आहेत. ते आल्यानंतर चौकार षटकार मारतात. ते आल्यानंतर आपल्याला कळतं की आपला स्कोर चांगला होणार आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातही दोन बंधू होते. स्टिव्ह वॉ आणि मार्क वॉ हे दोन बंधू त्यांच्या संघात होते. तसेच, आपल्याकडे दोन बंधू आहेत. एक आमदार सुनील राऊत (Sunil Raut) आहेत आणि दुसऱ्याचे नाव सांगण्याची गरजच नाही.

Aaditya Thackeray-Sanjay Raut-Sunil Raut
Satara Politic's : अजितदादांच्या खेळीने ‘पृथ्वीराजबाबां’ची पुरती नाकाबंदी; साताऱ्यातील काँग्रेसचा अखेरचा गडही कोसळणार!

मी परवा दिल्लीत गेलो होतो. दिल्लीत गेल्यानंतर संजयकाकांबरोबर फिरायला मजा येते. घरी आल्यावर मी आई-बाबांना सांगितलं की, पंतप्रधानांसोबत फिरायला जेवढी मजा येणार नाही, तेवढी मजा संजय राऊतांसोबत दिल्ली फिरायला बरं वाटतं. हातात कुठलंही शासकीय पद नसताना, मंत्रिपद नसतानाही जो काही वट संजयकाकांनी दिल्लीत निर्माण केला आहे ना, तो बघण्यासारखा आहे. तुम्ही आवर्जून दिल्लीत जावा आणि संजय राऊतांबरोबर फिरा, असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला.

Aaditya Thackeray-Sanjay Raut-Sunil Raut
Aaditya Thackeray : पंतप्रधानांपेक्षा राऊत काकांसोबत दिल्लीत फिरायला बरं वाटतं : आदित्य ठाकरे

दिल्लीत फिरताना प्रत्येक माणूस हा संजय राऊत यांना गुरुजी म्हणून नमस्कार करत होते. ते फक्त महाराष्ट्रातील लोकं करत नव्हती, तर देशभरातील लोक त्यांच्यासेाबत आदबीने वागत असतात. त्यांचा आवाज देशभरात सगळीकडे जातो. ते समोर आहेत म्हणून हे मी बोलत नाही, तर मी घरीही हेच सांगत असतो. अगदी भाजपचा जरी माणूस असला ना तो संजय राऊतांना डोळा मारतो सांगतो, ‘संजयजी, ठीक चल रहा है. ऐसेही लगे रहो...’ अगदी प्रेसमधील माणूसही संजय राऊतांना हेच सांगतो. हा वट दिल्लीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com