Aple Sarkar_DBT Portal 
महाराष्ट्र

Aaple Sarkar: महत्वाच्या दाखल्यांची काम खोळंबणार! 'आपले सरकार', डीबीटी पोर्टल अन् सरकारी ऑनलाईन सेवा 5 दिवस राहणार बंद

Government Websites Portals Closed: या सेवा कशासाठी बंद ठेवण्यात येत आहेत, याचं अधिकृत स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.

Amit Ujagare

Government Websites Portals Closed: विविध सरकारी सेवा आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी राज्य शासनानं 'आपले सरकार' पोर्टल विकसित केलं आहे. यासाठी ठिकठिकाणी अधिकृत केंद्रासाठी परवाने देखील देण्यात आले आहेत. सध्या या पोर्टलचं दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं ते प्राध्यान्यानं पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. याबाबत सरकारनं विशेष सुचनेद्वारे सुचित केलं आहे.

सरकारनं याबाबत माहिती देताना म्हटलं की, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) आपणास सूचित करू इच्छिते की, महाआयटीतर्फे विकसित केलेल्या तसेच देखभाली-अधीन असलेल्या आणि स्टेट डेटा सेंटर येथे होस्ट केलेल्या, महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांची संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/VLE सेवांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा अधिक स्थिर करण्यासाठी, डेटा सेंटरचे स्थलांतर आणि प्रणाली अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रक्रियेदरम्यान, संबंधित संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/VLE सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील. हे काम अत्यंत महत्त्वाचे असून ते प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे.

सेवा बंद राहण्याचा कालावधी

शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६, दुपारी ४:०० वाजल्यापासून मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत या सर्व सेवा बंद राहणार आहेत. ही तारीखही अपेक्षित तारीख असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कारण गरज पडल्यास हा कालावधी देखील वाढू शकतो. "आम्ही हे काम सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू," याची नोंद घ्यावी, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

परिणाम काय होणार?

या देखभाल कालावधीत सर्व संबंधित संकेतस्थळे, पोर्टल्स, ॲप्लिकेशन्स आणि नागरिक/VLE सेवा पूर्णपणे अनुपलब्ध असतील. वरील सूचना लक्षात घेत, सर्व तातडीचे ऑनलाइन अर्ज, सादरीकरण आणि प्रलंबित व्यवहार शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्यापूर्वी पूर्ण करून घ्यावेत. २० ऑक्टोबर २०२६ रोजी तांत्रिक प्रक्रिया आणि प्रणालीची तपासणी पूर्ण झाल्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होतील, असंही सरकारकडून कळवण्यात आलं आहे.

बंद असलेल्या सेवा/पोर्टल्स

  • नागरिक सेवा (Citizen services)

  • व्हीएलई (Village Level Entrepreneurs / सामाईक सेवा केंद्र) द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा

  • विशेषतः ‘आपले सरकार’ (Aaple Sarkar) पोर्टल वरील सेवा तांत्रिक देखभालीसाठी बंद राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT