DCC Bank Elections : जिल्हा बँक निवडणुकीबाबत मोठी घडामोड! 10 वर्षांच्या नियमाने धसका घेतलेल्या संचालकांना दिलासा

Kolhapur Sangli Satara DCCB Elections : भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार सलग दहा वर्ष संचालक असणाऱ्या संचालकांना बँकेत राहता येणार नाही असे आदेश भारतीय रिझर्व बँकेकडून देऊ शकतात. शिवाय तसे आदेश राज्यातील जिल्हा बँकेला देऊ शकते. मात्र दहा वर्ष संचालक पद भोगलेल्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखू शकत नाही.
Satara DCC Bank Elections
Satara DCC Bank ElectionsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 08 Oct : केंद्र सरकारच्या आणि भारतीय रिझर्व बँकेच्या नव्या नियमानुसार जिल्हा बँकेतील संचालकांना केवळ दहा वर्षे पदावर राहण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकेमध्ये दहा वर्ष संचालक असणाऱ्यांना पुढील पाच वर्ष निवडणुकीसाठी उभे राहता येणार नसल्यामुळे अनेकांनी या नियमाचा धसका घेतला होता.

शिवाय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह लातूर जिल्हा बँकेमध्ये आठ संचालकांना रिझर्व बँकेने अपात्र केल्यानंतर त्याचा धसका राज्यातील इतर बँकेतील संचालकांनी घेतला होता. मात्र पश्चिम महाराष्ट्रात होऊ घातलेल्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्हा बँकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या माहितीमुळे संचालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार सलग दहा वर्ष संचालक असणाऱ्या संचालकांना बँकेत राहता येणार नाही असे आदेश भारतीय रिझर्व बँकेकडून देऊ शकतात. शिवाय तसे आदेश राज्यातील जिल्हा बँकेला देऊ शकते. मात्र दहा वर्ष संचालक पद भोगलेल्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखू शकत नाही. अशी महत्त्वाची टिपणी सहकार क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे.

Satara DCC Bank Elections
Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

सध्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्हा बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असून 27 संचालकांना या टिपणीमुळे दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकारने बँकिंग रेग्यूलेशन अॅक्ट १९४९ मध्ये सुधारणा करत सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक म्हणून काम करण्यावर निर्बंध - आणले आहेत. मात्र राज्याच्या सहकार विभागाने सहकार कायदा अधिनियमात बदल केला नसल्यामुळे हा नियम राज्यातील कोणत्याच जिल्हा बँकेला लागू होणार नसल्याची माहिती समोर येत होती.

मात्र लातूर जिल्हा बँकेत कारवाई झाल्यानंतर या 27 संचालकांनी मोठा धसका घेतला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल केलेल्या मातब्बरांचा कार्यकाळ दहा वर्षापेक्षा अधिक आहे. त्यास हरकतीही घेण्यात आल्या. पण, उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र ठरवणे किंवा अर्ज नामंजुरीचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही. निवडून आल्यानंतर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार हे निश्चित आहे.

Satara DCC Bank Elections
Raigad ACB Action : महसूलचे पाच लाचखोर एसीबीच्या जाळ्यात; मंडळ अधिकाऱ्याने 1 लाख तर तलाठ्याने मागितले 1 हजार; कारवाईने रायगडात खळबळ

हे आहेत संचालक

कोल्हापूर जिल्हा बँकेतून मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, भय्या माने, माजी आमदार राजू आवळे, संतोष पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर. तर सातारा जिल्हा बँकेतून खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंराजे भोसले.

आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, नितीन पाटील, अनिल देसाई, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, प्रदीप विधाते, दत्तात्रय धमाळ, प्रभाकर घार्गे, तर सांगली जिल्हा बँकेतून माजी आमदार मानसिंगराव नाईक, खासदार विशाल पाटील, दिलीप पाटील, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, मोहनराव कदम, सुरेश पाटील व बाळासाहेब होनमोरे यांचा सामावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com