Abhijeet Deepke's Parents Get Emotional Sarkarnama
महाराष्ट्र

Abhijeet Dipake: 'लेकानं करून दाखवलं!' CJP च्या यशानंतर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

Abhijeet Dipake Parents Get Emotional: सीजेपी आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना. देशभर गाजलेल्या आंदोलनानंतर कुटुंबाचा अभिमान आणि आनंदाश्रू.

Mangesh Mahale

छत्रपती संभाजीनगरातील मराठमोळ्या अभिजीत दीपके नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने एक सोशल मीडिया चळवळ चालू केली आहे. अन् रोजगार, शिक्षण, भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यासाठी त्याने हा पक्ष काढला आहे. या पक्षाने शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची पहिली 'विकेट' घेतली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी सीजेपीने धर्मेद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास मोदी सरकारला भाग पाडले.

आपल्या लेकाच्या आंदोलनाच्या यशानंतर अभिजीत दीपके यांचे आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजी नगर येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपले मनमोकळे केले.

अभिजीतने सीजेपी स्थापन झाल्यापासून अभिजीत यांची याची आई अनिता दीपके आणि वडील भगवान दीपके यांना भीती होती. अभिजीतला कुठून तरी उचलवून नेतील की काय? सरकार काय करेल हे सांगता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी काही दिवसापूर्वी भीती व्यक्त केली होती. आज आपल्या लेकाच्या उभ्या केलेल्या अदभूतपूर्व देशव्यापी आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांना आनंदाअश्रू आले.

अभिजीतने जेव्हापासून 'कॉकरोच जनता पार्टी' स्थापन करून सरकारविरोधात थेट भूमिका घेण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आई अनिता दीपके आणि वडील भगवान दीपके यांच्या उरात भीतीचे सावट होते. अभिजीत इतक्या मोठ्या व्यवस्थेशी लढतोय, त्याला कुठून तरी पोलीस किंवा अज्ञात लोक उचलून नेतील की काय? आजकालच्या राजकीय वातावरणात सरकार काय करेल काही सांगता येत नाही, अशी प्रचंड भीती काही दिवसांपूर्वी त्याच्या पालकांनी व्यक्त केली होती.

आज जेव्हा अभिजीतने स्थापन केलेल्या CJP च्या देशव्यापी आंदोलनाला हे ऐतिहासिक यश मिळाले, तेव्हा त्या भीतीची जागा अभिमानाने आणि आनंदाश्रूंनी घेतली. एका सामान्य कुटुंबातील मराठमोळ्या मुलाने देशाच्या राजधानीपर्यंत आपल्या आंदोलनाची धडक मारून इतका मोठा बदल घडवून आणला, हे पाहून पालकांचे डोळे कौतुकाने भरून आले.

केवळ सोशल मीडियाच्या ताकदीवर अत्यंत कमी वेळात ही चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून, आगामी काळात ही चळवळ शिक्षण, नोकरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर अधिक आक्रमक रूप धारण करेल, असे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT