Aditya Thackeray Suraj Chavan sarkarnama
महाराष्ट्र

Legislative Council Elections : उद्धव ठाकरेंची नकारघंटा कायम, विधान परिषदेसाठी आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला उमेदवारी?

Aditya Thackeray Suraj Chavan : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटातून वेगवेगळी नावे समोर येत असताना आदित्य ठाकरेंच्या विश्वासून नेत्याचे नाव आघाडीवर आहे. आदित्य ठाकरे त्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.

Roshan More

Aditya Thackeray News : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेमध्ये जाण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेमध्ये कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांच्या नावांची चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरे हे वेगळ्याचा नेत्यासाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. या विषयी 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आणि आदित्य ठाकरेंचे विश्वासू असलेले सूरज चव्हाण यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे हे स्व:ता सूरज चव्हाण यांच्या उमदेवारीसाठी आग्रही असल्याचे समजते.

युवासेनेचा सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा सचिव असा प्रवास सूरज चव्हाण यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक असलेले सूरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीने कारवाई केली होती. मात्र, तरी देखील त्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली ते एक वर्ष तुरुंगात होते. मात्र, आपण दबावाला बळी पडणार नाही. आदित्य ठाकरेंचे साथ सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.

राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे हे प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळानी म्हणून आग्रही होते. मात्र, ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार यांना सोडण्यात आली होती. त्यामुळे आदित्य यांना नाराजी देखील व्यक्त केल्याचे समोर आले होते. त्यामुळे यावेळी सूरज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? याची उत्सुकता ठाकरेंच्या शिवसेनेत आहे.

काँग्रेस उद्धव ठाकरेंसाठी आग्रही

महाविकास आघाडीच्या वाट्याला विधान परिषदेतील नऊ पैकी एक जागा येत आहे. त्यामुळे या जागेवर उद्धव ठाकरे हे पुन्हा उमेदवारी असतील, अशी शक्यता होती. मात्र, उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक नसल्याचे समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT