Chandrakant Khaire News: शरद पवार या वयात राज्यसभेत, मग उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जायलाचं हवे! चंद्रकांत खैरेंची इच्छा

Chandrakant Khaire statement on Uddhav Thackeray MLC election: उद्धव ठाकरे यांनी आपण विधान परिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून सुषमा अंधारे,राजन विचारे, अंबादास दानवे, सुरज चव्हाण आदींची नावे समोर येत आहेत.
Chandrakant Khaire statement on Uddhav Thackeray MLC election
Chandrakant Khaire statement on Uddhav Thackeray MLC electionSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे या वयातही राज्यसभेवर जाऊन महाराष्ट्राची, देशाची भूमिका ठामपणे मांडत आहेत. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विधान परिषदेत जावे, अशी माझी आणि महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. ते विधान परिषदेत असतील तर या सरकारवर विरोधकांचा कंट्रोल राहिल. त्यांची विधान परिषदेतील उपस्थिती ही 2029 मध्ये होणाऱ्या सत्तांतराची नांदी ठरू शकते, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खारे यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 12 मे रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या रिक्त जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी आपण विधान परिषदेची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून उपनेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार राजन विचारे, अंबादास दानवे, सुरज चव्हाण आदींची नावे समोर येत आहेत.

Chandrakant Khaire statement on Uddhav Thackeray MLC election
Sarkari Naukri: सरकारी बदलीचे नियम बदलले! राजकीय दबाव आणल्यास कारवाई होणार; असा असेल प्राधान्यक्रम

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर पुन्हा जावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. लवकरच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा, आम्ही सर्वजण मुंबईत येऊ. राज्यसभेत ज्या प्रमाणे शरद पवार महाराष्ट्राची, देशाबद्दलची भूमिका ठामपणे मांडतात, तशीच भूमिका उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत असले तर सभागृहात मांडू शकतील.

Chandrakant Khaire statement on Uddhav Thackeray MLC election
Jay Pawar News: जय पवारांनी एका वाक्यातच गावकऱ्यांची मने जिंकली! अजितदादांच्या जुन्या भाषणांची आठवण

उद्धव ठाकरेंमुळे या सरकावर कंट्रोल राहू शकतो. विधिमंडळातील उद्धव ठाकरे यांची उपस्थिती ही 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील सत्तांतराची नांदी ठरू शकते. निश्चित पुढच्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येऊ शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद लढवलीच पाहिजे, असे ठाम मत खैरे यांनी व्यक्त केले.

Chandrakant Khaire statement on Uddhav Thackeray MLC election
Pune ZP News: गटशिक्षणाधिकारी सस्पेंड! ज्योती सावित्री शाळेबाबत चुकीची माहिती देणं पडलं महागात

आदित्य ठाकरेंना शुभेच्छा..

आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष केले जाणार आहे का? या प्रश्नावर ज्या पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती, त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवणार असतील तर निश्चितच आनंदाची बाब आहे. आदित्य ठाकरे यांनी आपले नेतृत्व गुण सिद्ध केले आहे, ते भविष्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होऊ शकतात, अशा शुभेच्छा खैरे यांनी या विषयावर बोलताना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com