

Congress Politics : विधान परिषद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 12 मेला मतदान होणार आहे. 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेमध्ये जाणार की नाही याची चर्चा आहे. दरम्यान, पुन्हा निवडणूक लढण्यास ठाकरे उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाकडून ऐनवेळी अंबदास दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणूक लढले नाही तर काँग्रेस त्या जागेवर दावा करण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेची जागा काँग्रेसने शरद पवारांसाठी सोडली होती. त्यामुळे आता ठाकरे जर लढणार नसतील तर काँग्रेस या जागेवर उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक असतील तर आम्ही त्याचा सहानुभुतीने विचार करू. विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहेही. ते जर विधान परिषदेवर जाणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष सहानुभूतीने विचार करेल. ते महाविकास आघाडीचा चेहरा आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत.
उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेमध्ये जाण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त एका मराठी वर्तमानपत्रानेदिले आहे. मात्र, पक्षाकडून अजुनही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. त्यातच उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेस सकारात्मक विचार करेल, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. त्यामुळे उमेदवारी बाबात उद्ध ठाकरे काय निर्णय घेतात याकडे त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे नाव येईल त्याला आमचा पाठींबा असणार आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये विजयी होण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 10 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार मिळून काँग्रेसच्या मदतीशिवाय देखील ठाकरेंचा उमेदवार विजयी होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.