Narhari Zirwal 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Narhari Zirwal statement : आदिवासी विद्यार्थी 14 दिवसांपासून आंदोलनात; झिरवळांच्या ‘नंबर’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Adivasi students in Pune have intensified their 14-day protest, seeking direct talks with CM Devendra Fadnavis : मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ; आंदोलक विद्यार्थ्यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा इशारा

Pradeep Pendhare

Narhari Zirwal number statement controversy : पुण्यातील मांजरी येथे विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे.

आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंत्री, आमदार आणि आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीचे प्रयत्न केले; मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. आता प्रश्न सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच चर्चा करणार असल्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांशी (Student) चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. पंरतु आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करतात. यावर प्रतिक्रिया देताना झिरवळ यांनी, “हे आपलेच आहेत, हक्काने बोलतात. त्यांची समजूत घालू,” असे सांगत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

या आंदोलनाच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांमध्ये अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचाही सहभाग होता. त्यांचा संदर्भ देत मंत्री झिरवळ (Narhari Zirwal) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा आक्रमकपणावर भाष्य केले. मात्र, विद्यार्थी आदिवासी लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्र्यांविरोधात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देत आहेत.

दरम्यान, झिरवळ यांच्याकडे राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे हे खाते सध्या चर्चेत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी कारवाया सुरू असताना, औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणामुळे फेरपरीक्षा घेण्याची वेळही प्रशासन आणि राज्य सरकारवर आली आहे.

कधी कोण नंबर लावेल...

याच पार्श्वभूमीवर मंत्री झिरवळ यांनी आपल्या खात्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. “आमचं खातं जर धरलं, आम्हाला पेच पडला आहे. कधी कोण नंबर लावून बसेल, भरोसा नाही,” असे विधान त्यांनी केले.

मंत्री झिरवळ यांचा रोख कोणाकडे?

मंत्री झिरवळ यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे होता, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी हे विधान आपल्या पक्षातील सहकारी आमदारांच्या संदर्भात केले की मित्रपक्षांतील राजकीय हालचालींबाबत सूचक भाष्य केले, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत.

आदिवासी विद्यार्थी आंदोलक आक्रमक

मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप सुरू असून, विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घेतल्याने पुढील काळात सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT