OBC certificate invalid : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून ‘राजकीय विकेट’; ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने पद रद्द

OBC Certificate Invalid; Shevgaon Councillor Rizwan Shaikh Loses His Post : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; प्रभाग क्रमांक तीनमधील ओबीसी जागा रिक्त
Rizwan Shaikh
Rizwan ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Shevgaon Municipal Council : शेवगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक रिजवान छोटूभाई शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक तीनमधील ओबीसी जागा रिक्त झाली असून, पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रिजवान शेख यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप फडके यांनी तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे गेले होते. समितीने संबंधित जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नगरसेवकपदाबाबत निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयात संबंधित व्यक्तीचा दावा केलेल्या जातीशी नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेख यांचे ओबीसी (OBC) जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यावर आधारित असलेले नगरसेवकपदही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rizwan Shaikh
NCP SP News : शरद पवारांच्या पक्षाला धक्का : कर्जतचे 6 नगरसेवक अपात्र; राजकीय समीकरणे बदलणार

जिल्हाधिकाऱ्यांनी शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रभाग क्रमांक तीन मधील ओबीसी जागा रिक्त झाल्याची नोंद घेऊन आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला याबाबत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या रिक्त जागेसाठी पुढील काळात निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

Rizwan Shaikh
BJP News : अकोलेमध्ये भाजपला मोठा दिलासा; 8 नगरसेवकांची अपात्रता तक्रार फेटाळली, 4 जणांच्या पदावर मात्र प्रश्नचिन्ह

रिजवान शेख यांच्या जात प्रमाणपत्राबाबत एकनाथ शिंदे शिवसेनेचे पराभूत उमेदवार प्रताप फडके यांनी आक्षेप नोंदविला होता. तक्रारीनंतर सुरू झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत प्रमाणपत्र अवैध ठरले आणि त्यानंतर शेख यांचे नगरसेवकपदही गेले.

या निर्णयानंतर शेवगावच्या राजकीय वर्तुळात “एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शिलेदाराने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिलेदाराची राजकीय विकेट घेतली” अशी चर्चा रंगली आहे. मात्र, नगरसेवकपद रद्द होण्यामागे अधिकृतरीत्या जात प्रमाणपत्र अवैध ठरण्याचा निर्णय हा मुख्य आधार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com