मनोज जरांगे पाटील सरकारला कुठलंही निवेदन देत नाहीत, पण जरांगे रोज पलटतात आणि खोटं बोलतात. मराठा समाजानं जरांगेंना स्वीकारलं. मात्र, २३ डिसेंबरला जरांगेंनी पहिली गुप्त बैठक घेतली. त्यानंतर रांजणगाव, पुणे, लोणावळा आणि वाशी येथे अनेक गुप्त बैठका जरांगेंनी घेतल्या. जरांगे पारदर्शक नाहीत, असे खळबळजनक आरोप श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे महाराज आणि जरांगेंचे निकटवर्तीय अजय महाराज बारसकर यांनी केले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
"जरांगेंना कायद्याचं काहीही कळत नाही. 15 मिनिटांत सरकारनं कसा काय सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढला? जरांगे सामाजिक विद्वेश पसरवतात. वाशीच्या बंद खोलीत कोणते वकील, अभ्यासक होते? काय चर्चा केली? हे जरांगेंनी जाहीर करावं," असं आव्हान बारसकरांनी दिलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"मराठा आरक्षण मिळालं म्हणून फटाके वाजवले, लोकांना आनंद झाला. पण, 'गुलाल घेण्यासाठी आझाद मैदानावर जायचं,' असं जरांगे हळूच म्हणाले होते. सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंनी वक्तव्य केलं होतं. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीत यावं आणि पाणी पाजावे, यासाठी जरांगेंनी अट्टहास केला. हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. जरांगे श्रेयवादासाठी काम करत आहेत," अशी टीका बारसकरांनी केली आहे.
"10 फेब्रुवारीला उपोषण करण्यापूर्वी जरांगेंनी मराठा समाजाची बैठक का घेतली नाही? जरांगेंचे मगरीचे अश्रू आहेत. जरांगेंनी मराठ्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत. जरांगेंनी अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या. हीच तुमची संस्कृती आहे का?" असा सवाल बारसकरांनी जरांगेंना विचारला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.