Sharad Pawar : "त्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे," अमित शाहांच्या टीकेचा पवारांनी घेतला समाचार; म्हणाले...

Sharad Pawar On Maratha Reservation : "मराठा आरक्षणाबाबत माझ्या मनात शंका, पण...", असंही शरद पवारांनी म्हटलं.
sharad pawar supriya sule amit shah
sharad pawar supriya sule amit shahsarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीवरून गांधी, पवार, यादव यांच्यावर टीका केली होती. "सोनिया गांधीचं लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे," असा हल्लाबोल अमित शाहांनी रविवारी ( 18 फेब्रुवारी ) केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी भाष्य केलं आहे. "माझी मुलगी विधानसभेला उभी राहत नाही," असं खोचक प्रत्युत्तर शरद पवारांनी शाहांना दिलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

sharad pawar supriya sule amit shah
Raigad Politics : शरद पवारांची पॉवरफुल खेळी; सुनील तटकरेंच्या विरोधात भावाला ताकद देत दिली मोठी जबाबदारी

अमित शाह काय म्हणाले होते?

"सोनिया गांधीचं लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना ( Supriya Sule ) मुख्यमंत्री बनवायचं आहे. उद्धव ठाकरे आणि लालू प्रसाद यादव यांना आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. भाजपत घराणेशाही असती, तर चाय विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाला नसता. लोकशाहीत सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे," असं विधान अमित शाहांनी केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"हे अमित शाहांना कळलं पाहिजे"

अमित शाहांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाकडे पत्रकारांनी शरद पवारांचं लक्ष वेधलं. शरद पवार म्हणाले, "माझी मुलगी विधानसभा निवडणुकीत उभी राहत नाही. तीन वेळा विधानसभेला नाही तर लोकसभेला निवडून आली आहे. हे अमित शाहांना कळलं पाहिजे. भाजपत एका कुटुंबातील कितीजण राजकारणात आहेत, याची यादी मी देऊ शकतो."

sharad pawar supriya sule amit shah
Sharad Pawar : अजित पवारांचे पुतणे तुमच्याबरोबर आले तर स्वागत करणार का? शरद पवार म्हणाले, "कुणी..."

"...तर मला आनंद होईल"

मराठा आरक्षण टिकणार नाही, अशी शंका मनोज जरांगे पाटलांना आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी म्हटलं, "कायदेशीर सल्ला देणाऱ्यांच्या मनात मराठा आरक्षणाबाबत शंका आहे. माझ्याही मनात शंका आहे. मात्र, हा प्रश्न सुटल्यास मला आनंद होईल. पण, 2014 मध्ये मराठा आरक्षण दिलेलं ते उच्च न्यायालयात रद्द ठरवलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात मंजूर झालं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात रद्द ठरवलं गेलं."

sharad pawar supriya sule amit shah
Sharad Pawar : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामागचं शरद पवारांनी सांगितलं 'कारण', म्हणाले...

"नाव अद्याप जाहीर केलं नाही"

बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याची शक्यता आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, "अजून तरी मला माहिती नाही. कारण आमच्या विरोधकांनी उमेदवाराचं नाव अद्याप जाहीर केलं नाही."

R

sharad pawar supriya sule amit shah
Nana Patole News : ‘या’ कारणांनी होतोय नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये विरोध !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com