Ajit Pawar minister dissatisfaction Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Minister Performance : शिवसेनेची राष्ट्रवादीला टशन : अजितदादांची 3 मंत्र्यांच्या सुमार कामगिरीवर प्रचंड नाराजी

Ajit Pawar unhappy with NCP ministers : लातूर, सातारा, नाशिक व गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची कामगिरी निराशजनक ठरली आहे.

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar angry over NCP minister performance: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिका निवडणुकीत मंत्र्यांनी जबाबदारी योग्यरित्या पार पाडली असती, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक जागा निवडून आल्या असत्या, अशा शब्दांत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार पक्षाची कामगिरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत कमी होती. विशेषतः लातूर जिल्ह्यतील मंत्री बाबासाहेब पाटील, सातारा येथील मकरंद पाटील, नाशिकमधील नरहरी झिरवळ आणि गडचिरोलीतील मंत्री बाबा अत्राम यांच्याबद्दल त्यांनी नाराजी दर्शवली. पक्ष पाठीशी असूनही गडचिरोलीत अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी मंत्र्यांना चांगलेच सुनावले.

लातूर, सातारा, नाशिक व गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची कामगिरी निराशजनक ठरली आहे. त्यामुळे अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराने तुलनात्मक कामगिरी चांगली ठरली आहे. त्या जोरावरच शिवसेनेने काही ठिकाणी चांगले यश मिळवले आहे.

याबाबत बुधवारीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी व्यवस्थित नव्हती. या निवडणुकीत काही मंत्र्याची कामगिरी निराशजनक असल्याचे बैठकीत स्पष्टपणे सांगत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, नरहरी झिरवळ आणि बाबा अत्राम यांच्या मतदारसंघातील कामगिरी निराशजनक असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः या ठिकाणची जबाबदारी या मंत्र्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीवेळी त्यांना फारशी चमक दाखवता आलेली नाही.

या निवडणुकीत पक्षाच्या मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अंग झटकून कामाला लागले असते तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनपेक्षा अधिक यश निवडणुकीत मिळाले असता, अशा शब्दांत सर्वांसमोर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT