BJP Vs MNS : उद्धव ठाकरेंशी हात मिळवताच पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'चा फडणवीसांना इशारा; संतापलेल्या भाजपनं राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओच काढला बाहेर

BJP On Shivsena-MNS Alliance: राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीची घोषणा करताच भाजपवर हल्ला चढवला होता. तसेच आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतील 'लाव रे व्हिडिओ'ची झलकही दाखवली होती.आता भाजपकडून राज ठाकरेंवर त्यांचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पहिला जशास तसा पलटवार केला आहे.
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मराठीचा मुद्दा पुढे करत आणि स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी अखेर ठाकरे बंधू एकत्र आले आणि बुधवारी (ता.24) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली.

यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीची घोषणा करताच भाजपवर हल्ला चढवला होता. तसेच आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतील 'लाव रे व्हिडिओ'ची झलकही दाखवली होती.आता भाजपकडून राज ठाकरेंवर त्यांचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पहिला जशास तसा पलटवार केला आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर आता मनसे आणि भाजपमधला वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेना-मनसे पक्षाची युती जाहीर होताच भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी बुधवारी (ता.24) राज ठाकरेंचा 2006 रोजी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट केला. मुंबई भाजपनेही एक पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. ठाकरे बंधूंनी तब्बल 20 वर्षांचं राजकीय मतभेद बाजूला सारत मराठीच्या मुद्द्यांवरुन एकत्र येण्याचे संकेत दिले होते. आता त्या शिवसेना मनसे मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकेत युतीत लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपनं (BJP) राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे.मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी 'बघा रे हा व्हिडीओ' असं म्हणत राज ठाकरे यांचा व्हिडिओ पोस्ट केला.ज्या चार लोकांमुळे बाहेर पडले, त्याच..." अमित साटम यांच्यानंतर मुंबई भाजपच्या अकाऊंटवरूनही हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्यानं मनसेसह आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
NCP Politics : 'खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ...' दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणामध्ये आडकाठी करणाऱ्या प्रशांत जगतापांना अजितदादांच्या आमदाराने सुनावलं

मुंबई भाजपनं व्हिडिओ पोस्टमध्ये "ज्या चार लोकांमुळे बाहेर पडले, आज त्याच ठिकाणी आलेल्या नवीन 'चार मामूं'च्या खान मानसिकतेच्या उबाठा गटाशी आघाडी केली. बघा रे हा व्हिडीओ", अशा शब्दात मुंबई भाजपने राज ठाकरेंना धारेवर धरलं आहे. ज्या ४ लोकांमुळे बाहेर पडले आज त्याच ठिकाणी आलेल्या नवीन "४ मामूं"च्या खान मानसिकतेच्या उबाठा गटाशी आघाडी केली. बघा रे हा व्हिडीओ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनीही शिवसेना-मनसे युतीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, फडणवीस म्हणाले, दोन पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली ही युती आहे.यामुळे फार काही परिणाम होणार नाही. मुंबईकरांचा या मंडळींनी सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबई बाहेर घालवण्याचे काम यांनी केले आहे. यांचा ट्रॅकरेकॉर्ड हा भ्रष्टाचार, स्वार्थीपणाचा असल्याचं म्हटलं आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड : ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा, मुंबईचा महापौरही ठरवला!

आता जनता भावनिक बोलण्याला भूलणार नाही. त्यांनी आणखी दोन-चार लोक सोबत घेतले तरी मुंबईकर काम पाहून महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही.मतांसाठी रोज मते बदलणारे आम्ही नाही. आम्ही कालही हिंदुत्ववादी होतो आणि उद्याही राहू, अशी टीका फडणवीसांनी राज ठाकरेंवर केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,काही युत्या या जनतेच्या विकासासाठी होतात,महायुती ही जनतेच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी आहे.पण आता झालेली युती ही सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो असा टोला एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना लगावला. युती कुणाचीही कुणाशी झाली तरी आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये मजबुतीने उभी आहे. लोकसभा, विधानसभा,नगरपालिकांमध्ये महायुती जिंकली.त्यामुळे अशा सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे काही फरक पडत नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : 'मामू'नां विरोधाची चंद्रकांत खैरेंची भूमिका योग्यच, संजय शिरसाटही सहमत!

मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेकडे यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी मठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. परंतु जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार. ठाकरे बंधूंची युती झाली तरीही विठ्ठल आमच्याकडे आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com