Congress-NCP Alliance: काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल! पण 'या' अटी पूर्ण झाल्या तरच अजित पवारांसोबत करणार आघाडी

Pune Municipal Elections: आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा नवीन प्रयोग पुण्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ajit Pawar and Satej Patil
Ajit Pawar and Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Congress-NCP Alliance: आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा नवीन प्रयोग पुण्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबरोबरच काँग्रेसलाही सोबत घेण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे प्रभारी असलेल्या सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करून आघाडीचा प्रस्ताव दिला असल्याचं सांगितलं जात आहे. याला सतेज पाटील यांनी देखील तुजोरा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षातील नेत्यांसोबत काँग्रेसची बैठक देखील पार पडली.

Ajit Pawar and Satej Patil
BSP Nagpur Election : 'बसपा'चा हत्ती रुतला आयाराम-गयारामांच्या गाळात; अस्तित्वासाठी धडपड...

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक करण्यापूर्वी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी हायकमांडची परवानगी घेतली असल्याचं समोर आला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीनंतरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपल्या चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल असल्याचं बोललं जात आहे.

Ajit Pawar and Satej Patil
Vijay Mallya High Court : विजय मल्ल्याला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका; भारतात कधी येणार? कोर्टाने नेमकं काय सुनावलं?

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी करण्यापूर्वी काँग्रेसने काही अटी ठेवल्या असल्याचं सांगितले जात आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढल्यानंतर निवडून आलेले नगरसेवक हे महाविकास आघाडी सोबतच राहतील ते नगरसेवक निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाहीत हा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हवा आहे.

Ajit Pawar and Satej Patil
municipal elections : शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी मास्टरस्ट्रोक घोषणा

तसेच मागील महापालिका निवडणुकीमध्ये 162 जागांपैकी काँग्रेसने 89 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे प्राथमिक प्रस्तावामध्ये काँग्रेसने 89 जागा आघाडीमध्ये आम्हाला मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे. जागा वाटपाच्या या मागणीवर आज सायंकाळी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अंतिम बोलणी होणार असून जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यानंतरच तिन्ही पक्षांच्या आघाडीची घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित झाल्यानंतर सतेज पाटील हे राज्यातील आणि दिल्लीतील हायकमांडशी याबाबत बोलणार असल्याचा देखील सांगितलं जात आहे. एकूणच काँग्रेसने ठेवलेल्या अटी-शर्ती मान्य झाल्यानंतरच काँग्रेसची पुण्यातील नवीन आघाडीमध्ये एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com