Rajasthan Governor Haribhau Bagde recalls a touching Assembly incident that reflected Ajit Pawar’s humane and sensitive leadership during condolence proceedings in the Maharashtra Legislative Assembly. Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : 'अंत्यविधी आधीच श्रद्धांजली वाहता येते का अध्यक्ष महोदय?' अजितदादांच्या प्रश्नाने हरिभाऊ बागडेही झाले होते स्तब्ध!

Haribhau Bagde Memory : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेतील एक भावनिक प्रसंग सांगत अजित पवार यांच्या संवेदनशील आणि माणुसकीपूर्ण नेतृत्वाची आठवण करून दिली.

नवनाथ इधाटे

Rajasthan Governor Haribhau Bagde : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाल्यानंतर सगळा महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. आज अजित पवार हे अनंतात विलीन झाले. पण त्यांच्या आठवणींचे काहूर अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनीही या निमित्ताने अजित पवारांबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असतानाच्या दोन प्रसंगाची आठवण यावेळी त्यांनी आवर्जून सांगितली.

एक स्पष्टवक्ता, शब्दाला जागणारा आणि माणुसकी जपणारा नेता हरपल्याची भावना सगळ्या क्षेत्रातून व्यक्त होत आहे. अजित दादांच्या आठवणींना उजाळा देताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भावुक झाले.

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अजित पवारांबाबतच्या काही प्रसंगाची आठवण सांगितली. मी 2014 ते 2019 या कालावधीत विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्या काळात सभागृहात अजित दादांचा वावर नेहमीच थेट, मुद्देसुद आणि प्रामाणिक असायचा.

ते कधीही वाईट हेतूने किंवा संकुचित भावनेने टीका करत नसत. एका हृदयस्पर्शी प्रसंगाची या निमित्ताने आठवण होते. सभागृहातील एका आमदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कार दुपारी होणार होते, मात्र सकाळीच विषयपत्रिकेवर श्रद्धांजलीचा विषय आला. त्यावेळी अजित दादा पवार यांनी अध्यक्षांना विचारले, 'अंत्य विधी आधी श्रद्धांजली वाहता येते का, अध्यक्ष महोदय'? हा प्रश्न अत्यंत साधा असला तरी त्यामागे त्यांची माणुसकी आणि संवेदनशीलता दिसून येत होती. तो प्रश्न आजही मा‍झ्या कानात घुमतो. त्या वेळेस मी त्यांना हो म्हणालो होतो.

तसेच 2015 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या पावसाळी अधिवेशनातील प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही. त्या वेळी मुसळधार पावसामुळे विधिमंडळात पाणी साठले होते. सभागृह सुरू झाल्यानंतर अजितदादांनी (Ajit Pawar) परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करताना 'अध्यक्ष महाराज धोतर वर करून साठलेले पावसाचे पाणी पाहत होते', असे विनोदी पण बोलके विधान केले होते. अजितदादा कधीही वैयक्तिक द्वेषाने वार करत नसत. स्पष्टवक्तेपण, विनोद बुद्धी आणि शब्दाला टिकून राहण्याची वृत्ती हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य होते.राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT