Ajit Pawar Plane Crash: मोठी बातमी! माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले; आणखी एका विमानाचा भीषण अपघात टळला

Air India Flight News : विमानाचे नियंत्रण सुटल्याने जमिनीला धडकून झालेल्या अपघातात मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. ही घटना ताजी असतानाच आता जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झाल्याची घटना घडली.
Air India
Air India Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बारामतीजवळ असलेल्या विमानतळाजवळच विमानाचा बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्त्ताने अजितदादांच्या बारामती परिसरात चार ते पाच सभा होणार होत्या. त्यासाठी अजित पवार हे बुधवारी सकाळी मुंबईवरून विमानाने बारामतीला निघाले होते. या विमानाचे नियंत्रण सुटल्याने जमिनीला धडकून झालेल्या अपघातात मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. ही घटना ताजी असतानाच आता जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झाल्याची घटना घडली.

बारामतीजवळील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग फेल झाल्याची घटना घडली. या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हे देखील प्रवास करत होते. या घटनेतून ते थोडक्यात बचावले. एअर इंडियाचे हे प्लेन दिल्लीवरून जयपूरला निघाले होते.

Air India
Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच हसन मुश्रीफ ढसाढसा रडले, 'आम्ही पोरके झालो...'

एअर इंडियाचं विमान AI-1719 बुधवारी दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर एअरपोर्टवर पोहोचले. त्यानंतर या विमानाने विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र, हे विमान जसे धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याचं लँडिंग फेल झाले. धावपट्टीवरील खराब स्थिती किंवा काही तांत्रिक समस्येमुळे या विमानाचे पहिले लँडिंग फेल झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या विमानाचं पहिलं लँडिंग फेल होताच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. विमान जसे रन वेला टच झाले, त्यानंतर लगेचच पायलटने प्लेन ला गो अराउंड केले.

Air India
Ajit Pawar Plane Crash : 'धावपट्टीला टच होताच भयंकर स्फोट अन्...' अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला?

या प्रकारानंतर तब्बल 10 मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर अखेर दुसऱ्या प्रयत्नामध्ये या विमानाचे धावपट्टीवर सुरक्षित लँडिग झाले. या विमानातून प्रवास करणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधवा हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. यावेळी विमानाचे देखील कोणतेच नुकसान झाले नाही.

Air India
Ajit Pawar Plane Crash: अपघातग्रस्त विमानात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह कोण होतं? जाणून घ्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंग करताना जर पायलटला विमानाचे लँडिंग सुरक्षित होणार नाही, असे वाटले तर तो पुन्हा एकदा विमान हवेत उडवतो आणि त्यानंतर पुन्हा सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला जातो, हे विमान अखेर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँड करण्यात आले आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

Air India
Ajit Pawar Plane Crash : 'धावपट्टीला टच होताच भयंकर स्फोट अन्...' अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com