Ramdas Kadam Sunil Tatkare ajit pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Death : 'अजितदादांच्या निधनानंतर लगेच तटकरेंचं गलिच्छ राजकारण, पवारसाहेब सुनेत्रावहिनींना...', रामदास कदमांचा गंभीर आरोप

Ramdas Kadam Allegation : रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत अजित पवारांची राख शांत होण्याआधीच राजकारण केल्याचे म्हटले आहे.

Roshan More

Ajit Pawar Death News Updates: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या प्रचारासभेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील माजी मंत्री रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

ते म्हणाले, 'अचानक काळ आला आणि अजितदादांना घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं शरद पवारसाहेबांना शह देण्यासाठी. ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे.'

'अजितदादांची राख देखी विझली नव्हती, शांत झाली नव्हती, असं असताना वहिनींना घेऊन मंत्रालयात नेऊन शपथ घ्यायला लावली. दहा दिवस गेले असते तर काय झालं असतं? पण हा माणूस किती चालाख आणि चाणक्ष आहे ते बघा त्यांना वाटलं शरद पवारसाहेब ताबा घेतील.', असे देखील रामदास कदम म्हणाले.

'तटकरेंना मी तिकीट द्यायला लावली. भाजपसोबत मी भांडलो. निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. तोच तटकरे विधानसभेला माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतोय. सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा भाव आहे असं मी म्हणेल', असा आरोप देखील त्यांनी केला.

जाधवांना डाॅक्टरची गरज

रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला. जाधवाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, मेंदू सडलेला आहे. त्यांना चांगला डाॅक्टरची गरज आहे. गुहारनगरमध्ये त्यांना पराभव दिसत आहेत म्हणून ते भूंकत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT