Mumbai News, 06 Feb : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (ता.03) आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा त्रास हजारो प्रवाशांना सहन करावा लागला होता.
पलटी झालेल्या टँकरमधील गॅस लिकेज झाल्यामुळे महामार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आणि यामुळे तब्बल 32 तासांची मोठी वाहतूक कोंडी झाल्याने सर्व महामार्ग बंद पडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, काल गुरूवारी ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. मात्र, अशातच आता आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी विकेंडमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे.
विकेंडमुळे महामार्गावर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सलग चौथ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना या मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या वाहतूक कोंडीवरून विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सोशल मीडियावर वाहतूक प्रशासन आणि सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि उपाययोजनांच्या अभावामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.