Mumbai News : बारामतीजवळील विमान अपघातात अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. शनिवारी राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे अजितदादांकडे असलेले अर्थखाते वगळता तीन खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चाला वेग आला आहे. त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे.
मुंबईत रविवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबत प्रश्न विचारला असता सीएम फडणवीस म्हणाले, 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली असती अथवा तारीख ठरली असती तर अजितदादा याबाबत माझ्याशी बोलले असते. मात्र, त्याबाबत ते काहीच बोलले नाहीत. अशा प्रकारच्या तारखेची आम्हला काहीच माहिती नाही. भाजपला(BJP) या विलीनीकरणाबत काहीच माहित नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा आमचा महायुतीमधील मित्रपक्ष आहे. मात्र त्यांचे निर्णय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस घेत असते, असेही सीएम फडणवीस यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विलीनीकारणाबाबत निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी, असेही सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शपथ घेऊन सांगतो की, आमची अजितदादा सोबत विलीनीकारणाबाबत चर्चा झाली होती. त्याबाबत त्यांच्यासोबत बैठकही झाली असल्याचे स्पष्ट केले.
याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले, ' येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार याच घेणार आहेत. अजितदादांच्या वारसदार या सुनेत्रा पवार या आहेत. त्यामुळे सर्व निर्णय तेच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.