Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताची खबर सर्वात आधी CM फडणवीसांना कळाली; पण कशी? जाणून घ्या

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्देवी विमान अपघातानंतर आता अनेक खुलासे होत आहेत, असाच एक महत्वाचा खुलासा झाला आहे.
Devendra Fadnavis_Ajit Pawar
Devendra Fadnavis_Ajit Pawar
Published on
Updated on

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्देवी विमान अपघातानंतर आता अनेक खुलासे होत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वात पहिली बातमी जर कोणाला समजली असेल तर ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. 28 जानेवारी रोजी अजित पवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या प्रचारसभा घेण्यासाठी विमानाने मुंबईतून बारामतीकडे निघाले होते. दुर्देवाने बारामती विमानतळावर लँडीग करताना त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले आण त्यात त्यांच्यासह विमानातील ५ जणांचा मृत्यू झाला. पण फडणवीसांना ही खबर सर्वात आधी कशी कळाली जाणून घेऊयात.

Devendra Fadnavis_Ajit Pawar
Supriya Sule: सुनेत्रा पवारांचा शपथविधी सुरु असताना सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट! काय झाली चर्चा?

अजित पवार बारामतीत येणार असल्याने पोलिस, त्यांचा कार्यालयीन सहकारी वर्ग, स्वीय सहायक हे विमानतळाच्या प्रतिक्षा कक्षात थांबून होते. आजवर असंख्य वेळा अजित पवार विमानाने बारामतीला आलेले असल्याने प्रतिक्षालयात सर्वजण अजित पवार विमानातून उतरुन येण्याची प्रतिक्षा करत थांबत असत. पण त्या दिवशी विमान कोसळल्याचा मोठा आवाज सर्वांना आला, विमानाने दोन घिरट्याही घातल्या आणि अचानक स्फोटासारखा आवाज झाला व सायरन वाजू लागला. त्यावेळेस सर्वांनीच धावपट्टीच्या दिशेने गाड्या घेत धाव घेतली. समोर अपघातग्रस्त विमान व लागलेली आग बघून अनेकांचे हातपायच गळून गेले होते.

Devendra Fadnavis_Ajit Pawar
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा शपथविधी, खाते वाटप अन् आता सरकारी बंगलाही दिला; तासाभरातच फडणवीसांनी सगळ्या गोष्टी मार्गी लावल्या

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अजित पवारांचे कार्यालयीन सहायक महेश यादव यांनी सर्वात पहिला फोन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक राजूरकर यांना केला. ते मुख्यमंत्र्यांसोबतच होते, ही बातमी ऐकून देवेंद्र फडणवीस यांनाही कमालीचा धक्का बसला. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना व्हिडीओ कॉल करुन महेश यादव यांनी या घटनेची कल्पना दिल्यानंतर पुढील सुत्रे हलली. राज्याच्या प्रमुखांना या घटनेची पहिली माहिती द्यावी असे त्याक्षणी मला वाटल्याने मी तसे केले असे महेश यादव यांनी नंतर सांगितले. घटनाच अशी होती की त्याक्षणी कोणालाच काहीच सुचत नव्हते, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com