Amol Mitkari NCP Sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari NCP : अमोल मिटकरींचं 'एक तीर तीन निशाण'; 'या' तीन नेत्यांना एकाच वेळी सुनावलं

NCP MLA Amol Mitkari Criticizes ShivsenaUBT Sanjay Raut BJP Gopichand Padalkar and OBC Laxman Hake Ajit Pawar Camp Reacts : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊत, गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

Maharashtra political news : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकाच वेळी तीन नेत्यांना सुनावलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके या तिघांवार एकाच वेळी प्रहार केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्यावरून, काही विधानं केली होती. त्यात काही अर्थ नाही, दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे म्हणजे संजय राऊत नाही, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. संजय राऊत यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यास विरोध केला. आता 'मनसे'ला देखील बाजूला केलं. त्यांनी त्यांच्यासारखं आम्हाला पाहू नये. त्यांनी आपलं घर सांभाळावं. त्यांच्या बोलण्याला कोणीही कवडीची किंमत देत नाही, असेही मिटकरी यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचं कौतुक केले. यावर बोलताना, फडणवीसांनी हसत खेळत मुलाखत होती. पवारसाहेब देशाचे मोठे आणि अनुभवी नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचं खुल्या मनाने कौतुक केलं. त्यांचा आदर्श त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक आमदाराने घ्यावा, असा सल्ला मिटकरी यांनी शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांना दिला.

पडळकरांना सुनावलं

निधी वाटपावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. आमदार अमोल मिटकरींनी पडळकरांना महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांसारखं बोलू नये, असा सल्ला दिला. त्यांना महाविकास आघाडीकडून काही मिळालं का? असं म्हटलं तर पडळकरांना वाईट वाटेल, असा टोलाही लगावला.

अजितदादांना भेटण्याचा सल्ला

निधी कोणी पळवला? किती पळवला? हे त्यांनी अभ्यास करून पहावं. शेवटी आपण एका सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. आमचे काही प्रश्न असले, तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो, तक्रारी करतो, परंतु असं आकंडतांडव करून काही साध्य होत नाही. त्यांना काही तक्रार असल्यास त्यांना अजित पवारांना भेटण्यास कमीपणा वाटत असेल, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, असेही मिटकरी यांनी म्हटले.

ओबीसींचे नेते कसे?

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यावरून आमदार मिटकरींनी लक्ष्मण हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे? असा सवाल केला. 2014 च्या निवडणुकीत सांगोल्यातून लढताना लक्ष्मण हाकेने एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला.

लक्ष्मण हाकेंना इशारा

दरम्यान, लक्ष्मण हक्केंनी आपली औकात पहावी, नंतरच अजित पवारांवर बोलावं. त्याला जास्त भाव देण्याची गरज नाही. मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा ही खारीचा वाटा आहे. तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग? मी आमदार झाल्यावर माझ्या गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो, तरी सन्मानजनक मते मिळवली. तुला आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत मिळून साडेसहा हजारावर मते देखील मिळाली नाहीत. लक्ष्मण हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल, असा इशारा आमदार मिटकरी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT