Political Horoscope: भविष्यनामा: पूर्वार्धात समाधानकारक पाऊस, उत्तरार्धात लहरी पर्जन्यमान कसा असणार आठवडा..?

भूकंप, वादळे, ढगफुटी, पूर, भूस्खलन यामधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. एकूण पर्जन्यमान कमी राहून पूर्व-ईशान्य व उत्तर भारतात मोठी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता राहील.
Political Horoscope
Political HoroscopeSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

पर्जन्यमानाचा एकूण विचार करता यावर्षीचे (२०२५) पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील वर्षात जाणवणार असून पिकांचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. याउलट भूकंप, वादळे, ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून हानी होण्याची शक्यता वाटते. यावर्षी पूर्वार्धात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल. मात्र उत्तरार्धात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ पडण्याची शक्यता राहील.

माघ शुद्ध प्रतिपदेनंतर ४ डिसेंबर २०२४ रोजी पूर्वाषाढा नक्षत्रावर मेघगर्भ होत असून मेघप्रसूती ४ डिसेंबरनंतर १९५ दिवसांनी म्हणजे १६ जून २०२५ रोजी मेघप्रसूती होत आहे. १६ जूनपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला सुरवात होईल. संवत्सर आरंभ कुंडलीमध्ये सिंह लग्न असून केंद्रस्थानी शनी-गुरू-हर्षल असून अष्टमातील अमावस्या व सोबत बुध शुक्र नेपच्यून राहू अशा ग्रहांची गर्दी असल्याने या वर्षीचे पर्जन्यमान कमी राहील. भूकंप, वादळे, ढगफुटी, पूर, भूस्खलन यामधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील. एकूण पर्जन्यमान कमी राहून पूर्व-ईशान्य व उत्तर भारतात मोठी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता राहील.

मेष संक्रमण कुंडलीनुसार कुंभ लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी गुरू-हर्षल असून, धनस्थानी राहू-नेपच्यून, बुध, शुक्र, शनी असे ग्रह असल्याने एप्रिल ते जून या काळात वादळे, भूकंपासारखी घटना संभवते. कर्क संक्रमण कुंडली - धनू लग्नाच्या पत्रिकेत चतुर्थस्थानी चंद्र-शनी नेपच्यून व सप्तमात गुरू, अष्टमात रवी, बुध अशी ग्रहस्थिती असल्याने जूनअखेरपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चांगल्या पावसाला सुरुवात होईल. खरिपांच्या पिकांसाठी उपयुक्त पाऊस जून ते सप्टेंबर या काळात होईल. नद्या, धरणे यांच्या पातळीमध्ये चांगली वाढ होईल.

मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून, पावसालाही सुरुवात झाली आहे. केरळ किनारपट्टीवर अंदाजापेक्षा आधी मान्सून दाखल झाला आहे. पावसाने जूनच्या पूर्वार्धात चांगली सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. मात्र जूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण अल्प राहील. जुलैच्या पूर्वार्धात सर्वत्र मोठ्या पावसाची शक्यता राहील. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल. मात्र, काही ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती दर्शवते. १६ जून ते १५ जुलै सर्वत्र चांगली वृष्टी होईल. तर, ऑगस्ट २०२५ या महिन्यात मध्यम पर्जन्यवृष्टी संभवते. अनेक प्रदेशात कमी पावसाने चिंता निर्माण होईल. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात हवेमध्ये मोठी उष्णता निर्माण होईल. वादळे होतील. अल्पवृष्टी होण्याची शक्यता असून काही प्रदेशात दुष्काळ पडण्याची शक्यता राहील.

Political Horoscope
Punishment for Dowry : खबरदार... विवाहितेचा छळ कराल तर ! काय सांगतो कायदा?

ऑक्टोबरच्या पूर्वार्धातही अल्पवृष्टी संभवते. मात्र उत्तरार्धात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होईल. मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळित होईल. २० मे ते ८ जून या काळात मोठे पाऊस अपेक्षित आहेत. दोन ते सात जून मोठी वृष्टी होईल. पश्चिम किनारपट्टी, मुंबई, कोकण, गोवा या प्रदेशात मोठे पाऊस होतील. ११ ते १४ जून व १७ ते २० जून या तारखांना मोठे पाऊस होतील.

एकूण विचार करता २०२५ मध्ये मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होणार असून जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल होईल. महाराष्ट्रात १६ जून ते १५ जुलै, २ ऑगस्ट सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी होईल. तर २ ऑगस्टनंतर अल्पवृष्टी संभवते, तर परतीचा पाऊस २० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या दरम्यान मोठ्या प्रमाणावर होईल. एकूण पर्जन्यमान सरासरीच्या ९०% होण्याची शक्यता राहील.

साप्ताहिक राशिभविष्य

३१ मे ते ६ जून २०२५

मेष : सप्ताहात चंद्र-मंगळ युती पंचमाजवळ होत असल्याने संततीविषयी मोठे निर्णय होतील. मुलांशी मतभेद संभवतात. मन आनंदी, उत्साही राहील.

वृषभ : घरातील वातावरण गरम राहील. घर, वाहन दुरुस्तीसाठी खर्च होतील. वाहन जपून चालवावे. चंद्र-शुक्र नवपंचम योगामुळे मोठे प्रवास होतील.

मिथुन : मोठे धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाची कामे होतील. कर्तृत्व सिद्ध होईल. खेळ, स्पर्धा, निवडणुकांमध्ये यश मिळेल. भावंडे, नातेवाइकांशी मतभेद टाळावेत.

Political Horoscope
BJP Vikram Pachpute : 'सत्तेतील नेत्यांना विरोधकांचे पक्षप्रवेश सवयीचे'; जगताप-नागवडेंच्या NCP प्रवेशावर आमदार पाचपुतेंचा खोचक टोला

कर्क : कुटुंबातील वादविवाद अनुभवास येतील. डोळे, दात, घसा यांचे दुखणे त्रास देतील. स्पष्टवक्तेपणामुळे वाद संभवतात. मोठे खर्च होतील. आर्थिक नुकसान सहन करावे लागतील.

सिंह : राशीतील चंद्र-मंगळ युतीमुळे स्वभावात आक्रमकपणा वाढेल. नेतृत्वाची संधी मिळेल. तीर्थयात्रा, प्रवास होतील. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

कन्या : व्ययातील चंद्र-मंगळ युती मोठे खर्च करणारी राहील. विमा, वारसा हक्कातून लाभ होईल, कमी श्रमातून मोठे लाभ होतील. व्हिसा, पासपोर्टची कामे होतील.

तूळ : लाभ स्थानातील चंद्र-मंगळ युती आपला प्रभाव वाढविणारी असून, शत्रूवर विजय मिळेल. जुनी येणी वसूल होतील. स्पर्धा, निवडणुकांमध्ये विजय मिळेल. धाडसी निर्णय यशस्वी होतील.

वृश्चिक : सामाजिक, राजकीय क्षेत्रात दबदबा वाढेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मोठे पद, प्रतिष्ठा मिळेल. मात्र वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.

धनू : गुरुजनांशी आदराने वागावे. बदनामीपासून सावध राहावे. विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश मोठ्या कष्टाने मिळतील. चंद्र-शुक्र शुभ योगामुळे नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. तरुणांना जोडीदार मिळेल.

Political Horoscope
Political Horoscope: भारत-पाकिस्तानातील प्रमुखांचे वाक्‌युद्ध रंगणार; सीमेवर पुन्हा युद्धजन्य स्थिती?

मकर : आरोग्यासाठी प्रतिकूल राहील. वाहन जपून चालवावे. भावंडांची काळजी घ्यावी लागेल. घर, जागेविषयी कटकटी संभवतात. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल.

कुंभ : सप्तमातील चंद्र-मंगळ युती जोडीदाराशी मतभेद वाढविणारी राहील. भागीदारीच्या व्यवसायात मनस्ताप संभवतो. कोर्टकचेरीमध्ये त्रास संभवतो. वादविवादाचे प्रसंग टाळावेत.

मीन : षष्टातील चंद्र-मंगळ युती शत्रूवर मात करणारी असून, कोर्टकचेरी, निवडणुका, स्पर्धा यांमध्ये विजय मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत कष्ट वाढेल. दगदग होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com