Rohit Pawar News : कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाले. अजित पवार हे महिला अधिकाऱ्याला दम देत आहेत, असे म्हणत त्यांच्यवार टीका करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार हे अजितदादाच्या समर्थनार्थ मैदानात उतले आहेत.
रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवारांची बाजु घेतली. ते म्हणाले, 'वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.'
'करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे. आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं.' असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी थेट युपीएससीला पत्र पाठवत अंजली कृष्णा यांच्या जाती प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणापत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या कागदपत्रांविषयी संशय व्यक्त केला जात आहे, असे मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
अजित पवार यांनी या सगळ्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.