Beed Crime : पुण्यातील मर्डरनंतर बीडमधील तरूणाची हत्या : गणपती समोर नाचल्याचा व्हिडिओ पोस्ट केला अन् मित्रानेच घात केला

Beed Murder Incident : बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करत एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे पुन्हा एकदा बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 06 Sep : ऐन गणेशोत्सवात पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर मुलगा गोविंद कोमकर याची शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

नाना पेठेतील हमाल तालीमजवळ एका इमारतीच्या पार्किंगमध्ये ही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. पुण्यात हा रक्तरंजित थरार घडला असातनाच आता बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ती म्हणजे बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करत एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे पुन्हा एकदा बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास विजय काळे हा मित्रांसोबत गणपती मंडळात डान्स करत होता.

Beed Crime News
Pune Gang war: पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर! वनराज आंदेकरच्या हत्येचा घेतला बदला

या डान्सचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केला. यानंतर त्याचा मित्र अभिषेक गायकवाडसोबक किरकोळ कारणावरून वाद झाला. याच वादातून अभिषेक गायकवाडने विजयच्या छातीत धारदार शस्त्राने वार केले.

यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजयला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर आरोपी पळून एका डोंगराळ परिसरात लपून बसला होता.

Beed Crime News
Manoj Jarange Patil : मराठवाड्यातील मराठे सरसकट कुणबी होणार, मनोज जरांगे-पाटील यांचा दावा, भुजबळांनाही डिवचले

याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. मयत विजय काळे याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर बीडसह राज्यभरात अनेक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवात झालेल्या या हत्येमुळे बीड पुन्हा एकदा हादरलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com