Mumbai News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालावरून प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली होती. या आरोपांनंतर आता सुनील तटकरे यांनी विमान अपघाताच्या तपासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तटकरे यांच्या या भूमिकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली असून, 'आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?' असा सवाल उपस्थित केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अपघाताच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्षांवर काही नेत्यांनी आक्षेप घेतला असून, या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची मागणी केली जात आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनीही या अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात किंवा भूमिका असल्याचा आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर पुन्हा भाष्य करत अपघाताच्या तपासाबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. विमान अपघाताच्या प्राथमिक तपास अहवालाशी सहमत नसल्याचे सांगत या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर यावे, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे.
तटकरे मोदी-शहांना भेटणार, सपकाळांचा सवाल
सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणात आता भेट घेण्याची भूमिका मांडणाऱ्या तटकरेंना सपकाळ यांनी 'आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?' असा सवाल केला.
तटकरे यांनी या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची भूमिका मांडली असली, तरी सपकाळ यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय टीका केली आहे. त्यामुळे विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दिशेने अधिक तीव्र होताना दिसत आहे.
नरेंद्र मोदींच्या सोनं खरेदीच्या वक्तव्यावरही सपकाळांचा पलटवार
हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोनं खरेदीसंदर्भातील वक्तव्यावरही टीका केली. वर्षभरापूर्वी गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, असे आपण सांगितले होते आणि लोकांनी आपले ऐकल्यामुळे त्यांना फायदा झाला, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचा संदर्भ देत सपकाळ यांनी पलटवार केला. सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी परदेशी दौरे करू नका, असेही सांगितले होते. तसेच भाज्यांमध्ये तेल टाकू नका, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, स्वतःच्या वाढदिवशी जे दिवे लावले, त्यातच सगळं आलं, असा टोला सपकाळ यांनी लगावला.
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आता हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित होण्याची शक्यता आहे. तटकरे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याने या प्रकरणातील तपास, प्राथमिक अहवाल आणि राजकीय आरोप यावर पुढील काळात आणखी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.