Sunil Tatkare : टोरंट प्रकल्पावरून महायुतीत मतभेद? सुनील तटकरेंनी केली सरकारचं टेन्शन वाढवणारी मागणी

Sunil Tatkare Opposes Torrent Project : कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला आणि त्यासाठीच्या वृक्षतोडीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध होत आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून रायगडच्या राजकारणात संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. प्रकल्पाच्या समर्थनार्थ आणि विरोधात सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने महायुतीतही मतभेद समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

भीमाशंकर परिसरातील पर्यावरणीय संवेदनशीलता, प्रस्तावित वृक्षतोड आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने टोरंट जलविद्युत प्रकल्पाबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. याआधी राष्ट्रवादीच्या प्रकल्पविरोधी भूमिकेवरून कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती. सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा असेल, तर सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान त्यांनी दिले होते. या विधानामुळे महायुतीतील राजकीय वाद चांगलाच चर्चेत आला होता.

सह्याद्रीच्या पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित

माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी भीमाशंकरच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्या, तरी सह्याद्रीचा हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने वृक्षतोडीचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : दादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची दांडी; तटकरेंनी कारणचं सांगितलं

पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक जनभावना लक्षात घेऊन सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तटकरे यांच्या या भूमिकेमुळे प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या सरकारसमोर राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीतील राष्ट्रवादीकडूनच प्रकल्पाबाबत फेरविचाराची मागणी होत असल्याने या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षांमध्ये एकमत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रकल्पाला अनेक पक्षांचा विरोध

कर्जत तालुक्यातील भीमाशंकर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पाला यापूर्वी ठाकरे गटाची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेकाप, काँग्रेस आणि स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. वृक्षतोड, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिकांच्या हिताचा मुद्दा उपस्थित करत विविध संघटना व राजकीय नेत्यांनी प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : 'वाकडाई देवीने, पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी!' : संतापलेल्या तटकरेंनी शिवसेनेला एका वाक्यात सुनावले

प्रकल्पाबाबत विरोध तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प हरित ऊर्जा निर्मितीशी संबंधित असून पर्यावरणपूरक असल्याची भूमिका मांडली होती. विरोधकांकडून प्रकल्पाबाबत करण्यात येणारे आरोपही त्यांनी फेटाळले होते. मात्र, स्थानिकांचा विरोध आणि राजकीय दबाव वाढल्यानंतर परिसरातील वृक्षतोड थांबवण्यात आल्याचे चित्र आहे.

साई डोंगर परिसरात पुन्हा संघर्षाची ठिणगी

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. प्रकल्पासाठी झालेली वृक्षतोड आणि प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी जमीन मोजणीच्या नोटिसा जारी करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये असंतोष वाढला आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच साई डोंगर परिसराला भेट देत वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली होती. प्रकल्पासाठी प्रस्तावित रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने जमीन मोजणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर या प्रक्रियेलाही विरोध सुरू झाला. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जमीन मोजणीच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare Setback : सुनील तटकरेंना मोठा धक्का, कट्टर विरोधकांकडून राष्ट्रवादीला खिंडार, राष्ट्रवादीचे शिलेदारांच्या हाती 'धनुष्यबाण'

टोरंट प्रकल्पावरून स्थानिकांचा विरोध, विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा आणि महायुतीतील घटक पक्षांकडूनच फेरविचाराची मागणी होत असल्याने कर्जतचा हा मुद्दा आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित न राहता राजकीय संघर्षाचे केंद्र बनण्याची चिन्हे आहेत. सरकार या प्रकल्पाबाबत पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.