Rohit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान दुर्घटनेमध्ये निधन झाले. या अपघाताची चौकशी सुरू आहे. मात्र, हा अपघात होता की घातपात याविषयी संशय अजित पवारांचे पुतणे, आमदार रोहित पवार व्यक्त करत आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
विमानातील ब्लॅक बाॅक्स पूर्ण जळाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यावरून रोहित पवार म्हणाले की, ब्लाॅक बाॅक्स हा खूप मजबूत असतो. मोठा स्फोटात देखील तो सुस्थितीत राहतो. आपण पाहिले तर अजितदादांच्या विमानातील कागदपत्र जळलेली दिसत नाहीत. मात्र, ब्लाॅक बाॅक्स कसा जळाला?
पुढे बोलताना ते म्हणाले, 'विमानाच्या अपघाताचे जे नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. त्यामध्ये विमान कोसळल्यानंतर आणखी काही स्फोट होताना दिसत आहेत. विमानात आणखी इंधन असल्याशिवाय हे शक्यत नाही. विमानाच्या दोन्ही पंखामध्ये इंधन असताना अधिकचे इंधनाचे दोन कॅन हे विमानात ठेवल्याचा आम्हाला संशय आहे. जास्त इंधन भरून घातपात करण्याचा प्लॅन असावा.हे विमान मुद्दाम खाली आपटण्यात आले याचा आम्हाला संशय आहे. '
रोहित पवार म्हणाले की, अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्याची किंमत 35 कोटी रुपये होती. मात्र, ते विकायला काढले असते तर ते 10 कोटीला विकले गेले असते. मात्र, या विमानाची इन्शूरन्सची किंमत 55 कोटी होती. तसेच अपघातामध्ये व्यक्ती गेली ते घरावर पडले, व्यक्तीवर पडले, विमानातील व्यक्तींचा निधन झाले तर इन्शूरन्स 210 कोटी गेला असता. या अपघातात मुख्य पायलटला किती रुपये मिळणार, याची माहिती पायलटला होती का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.