Kumbh Mela Sadhu Politics: सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी विविध कामे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. त्यावरून नागरिक आणि साधू यांच्यातही असंतोषाची ठिणगी पडली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे गर्दी झाल्यास होल्डिंग एरिया म्हणून मोठ्या प्रमाणावर जमीन ताब्यात घेतली जात आहे. त्याला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. त्यासाठी आमदार हिरामण खोसकर आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालण्यात आले होते.
आता त्र्यंबकेश्वर शहरातील जमीन बांधण्यासाठी संपादित केली जात आहे. पाटबंधारे विभागाने त्यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्याची तीव्रता आता आणखी वाढू लागली आहे.
गोदावरी नदीपात्रालगत भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कुशावर्तावरील गर्दी टाळण्यासाठी अन्यत्र नदीवर घाट बांधले जाणार आहेत. यापूर्वीच्या कुंभमेळ्यातही असे घाट बांधण्यात आले होते. यंदा मात्र हे घाट वादाचा विषय ठरले आहे.
गोदावरी घाटांसाठी त्र्यंबकेश्वर येथील बडा उदासीन आखाड्याची जागा संपादित केली जाणार आहे. जमिनीवर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंची व्यवस्था संबंधित आखाडा करीत असते. आता या जमिनीवर घाट बांधल्यास साधूंची दुहेरी कोंडी होणार आहे.
या साधूंनी या विरोधात शंखनाद केला आहे. बडा उदासीन आखाड्याने थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कार्यालय गाठले. कोणत्याही परिस्थितीत ही जमीन दिली जाणार नाही. शंभर वर्षांपासून ह्या जमिनीचा वापर कुंभमेळ्यासाठी आणि साधूंच्या निवासासाठी होतो, असा दावा त्यांनी केला.
जमीन हवी असल्यास आम्हाला पर्यायी जमीन द्यावी. एक गुंठा जमिनीला पंचवीस लाख रुपये भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली. साधूंची ही मागणी मान्य केल्यास एक एकर जागेला दहा कोटी रुपये भरपाई द्यावी लागेल. हा दर देणे कोणालाही शक्य होणार नाही.
भूसंपादनाला शेतकऱ्यांनी यापूर्वीच विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू आहे. आता आखाड्यांचे साधू देखील मैदाना उतरले आहेत. ज्यांच्यासाठी कुंभमेळा भरवला जातो, त्या साधून नीच प्रशासनाविरुद्ध संघर्षाचा इशारा दिल्याने तो चर्चेचा विषय आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.