Ajit Pawar Slams Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'अधिवेशनात पाच दहा मिनिटे हजेरी लावल्याने...'; अजितदादांनी उद्धव ठाकरेंच सगळंच काढलं

Ajit Pawar on Uddhav Thackeray News : राज्य सरकारला सत्तेचा माज आला असल्याची टीका पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली होती. अधिवेशन काळात या सरकारने कुठलीच नवी घोषणा केलेली नाही. राज्य सरकारला सत्तेचा माज आला असल्याची टीका पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

विधिमंडळाचे काम केले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाही, असेही अजित पवार म्हणाले. विधीमंडळाचे अधिवेशन हे चार आठवडे झाले. या काळात दररोज आम्ही 9 तास काम करत होतो. विरोधकांना कोणताच मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळं ते मुद्दे काढत आहेत, केवळ विरोधकाकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असलयाचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्ये विविध विषयांच्या संदर्भातील आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. पुढच्या वर्षभरात कोणत्या कामासाठी किती निधी द्यावा लागणार आहे, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

महानगरपालिकेला देखील चांगल्या इमारतीची गरज आहे. उत्तम प्रकारच्या शाळा कशा होतील यावर देखील चर्चा झाली आहे. चर्चा समाधानकारक झाली आहे. काही गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी लागेल. कोल्हापूरच्या विमानतळाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.

कुठलाच प्रश्न मांडला नाही

इचलकरंजी महापालिका जीएसटी मुद्दा अजून आहे तो सोडवला जाईल. प्रवेश केलेले आपलेच कार्यकर्ते होते, मध्यंतरी कोण इकडे कोण तिकडे असं झालं असेही अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

2100 रुपये देण्याचा निर्णय लवकरच : उपमुख्यमंत्री

नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. लाडकी बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. माझी थोडी तारांबळ होतेय, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT