Bjp News : मुस्लिमांबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केली भाजपची भूमिका स्पष्ट; म्हणाले, 'विरोधात...'

Chandrashekhar Bawankule on Muslims News : नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. या सर्व घटनाक्रमावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले.
Chandrashekhar Bawankule 2
Chandrashekhar Bawankule 2Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे भाजपच्या विरोधात अल्पसंख्यक समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. दंगलीला प्रोत्साहित करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत असाही रोष आहे. या सर्व घटनाक्रमावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मत व्यक्त केले .

भाजप पक्ष (Bjp) मुस्लिमांच्या विरोधात नाही. पाकिस्तानने मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणाऱ्यांना आमचा विरोध आहे. राज्यात हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये भाऊबंदकी आहे आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले

Chandrashekhar Bawankule 2
Maharashtra Assembly Session: मुंडेंचा राजीनामा ते कामराचं कंगाल...! अखेर एका 'दिशा'हीन अधिवेशनाचं सूप वाजलं, पण तुमच्या आमच्या हाती काय..?

नागपूरमधील दंगलीनंतर काँग्रेसने (Congress) सत्य शोधन समिती स्थापन केली आहे. समितीने भाजप आणि पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. राज्यपालकांकडे तक्रारसुद्धा केली आहे. विशिष्ट समाजाला सरकार टार्गेट करीत आहेत. त्यांच्या घरावर बेकायदेशीर बुलडोजर चालवला जात आहे. देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप सत्य शोधन समितीने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.

Chandrashekhar Bawankule 2
BJP Politics: 'स्थानिक'साठी फडणवीसांचा 'मास्टर प्लॅन'; भाजपसाठी फायदेशीर ठरणार की गटबाजीला खतपाणी घालणार..?

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपच्या मायनॉरिटी कमिटीने रमजानच्या निमित्ताने तो कार्यक्रम राबवला आहे. भाजपचे अनेक अल्पसंख्यक मुस्लिम मोर्चा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जात आहे. आम्ही मुस्लिम विरोधी लोक नाही आहोत. स्टँडअप कॉमेडियन कामरा याच्यावर झालेला हल्ला आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली त्यांची बाजू यावर बावनकुळे यांनी त्यांना पुढचे भविष्य दिसत नसल्याचा टोला लगावला.

Chandrashekhar Bawankule 2
Devendra Fadnavis Politics: अधिवेशनाचे सुप वाजले; गिरीश महाजन अद्यापही वेटिंग वरच!

शिंदे यांच्या विरोधात जेवढा रोष निर्माण होईल, त्यातून आपल्याला थोडी जागा मिळेल, यासाठी ते टीका करीत आहेत. यापेक्षा त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करावे. त्यांचा पक्ष रोज फुटत आहे. लोक सोडून जात आहेत. मोदी, शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यावर बोलण्यापेक्षा आपला कार्यकर्ता पक्ष का सोडत आहे? याचा विचार त्यांनी  केला  पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Chandrashekhar Bawankule 2
Latur BJP politics : लातूर भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष पदावरून रस्सीखेच; 'या' नेत्यापैकी कोणाची लागणार वर्णी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com