Devendra Fadnavis Politics: अधिवेशनाचे सुप वाजले; गिरीश महाजन अद्यापही वेटिंग वरच!

Devendra Fadnavis; Budget session over, who will guardian minister is unclear, Girish Mahajan on Waiting -अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष नेता आणि नाशिक, रायगडचा पालकमंत्री पदाचा गुंता सुटलाच नाही.
Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan
Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र या अधिवेशनात सातत्याने राज्याच्या हिताऐवजी वादाच्या विषयांची अधिक चर्चा झाली. यामध्ये विरोधी पक्ष नेता आणि पालकमंत्री पद याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रामुख्याने नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकचा पालकमंत्री कोण? याची मोठी उत्सुकता होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांचे नाव त्यासाठी आघाडीवर होते.

Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan
Dr. Radhakrishna Vikhe Patil: नाशिकचे नेते एकवटले, गोदावरी खोऱ्यात पाणी वळण्यावर ठाम!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळा हाच प्रमुख विषय होता. यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय केव्हा होणार, हा विषय त्यांनी एका वाक्यात उडवून लावला. पालकमंत्री नसले तरीही मुख्यमंत्री सर्व निर्णय घेत असतात. मी आहे ना, असे त्यांनी सांगितले.

Dada Bhuse, CM Devendra Fadanvis & Girish Mahajan
Kumbh Mela Politics: नाशिक की त्रंबकेश्वर? कुंभमेळ्या आधीच साधूंमध्ये रंगतोय आखाडा!

नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांची घोषणा झाली होती. त्यामुळे अनेकांना विशेषतः भाजपच्या आमदार आणि नेत्यांना तेच पालकमंत्री होतील अशी आशा आहे. ते त्यांच्या सोयीचे देखील आहे. सध्या जलसंपदा मंत्री महाजन हे देखील नाशिकमध्ये वावरताना पालकमंत्री या अविर्भावातच वावरत असतात. त्यामुळे भाजपला तो सुखदः धक्का देखील आहे.

नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत वाद आहे. हा वाद प्रामुख्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने घेतलेल्या आक्षेपामुळे निर्माण झाला आहे. नाशिकला दादा भुसे यांनाच पालकमंत्री ठेवावे, असा उपमुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.

रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाली होती. मात्र या जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांची संख्या अधिक आहे. कोकणावर प्रभुत्व वाढवायचे असेल तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेना शिंदे पक्षालाच हवे. असा या नेत्यांचा आग्रह आहे. मंत्रिमंडळातील काही सदस्य रायगडच्या पालकमंत्री पदावरून आक्रमक आहेत.

या स्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय सुटेल, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. मात्र विरोधी नेतेपदाचा विषय जसा शेवटच्या क्षणी वादग्रस्त झाला. त्याच पद्धतीने पालकमंत्री पदाचा निर्णय देखील असाच अडचणीत आला. तिन्ही पक्षांमधील समन्वय त्यासाठी कमी पडल्याची चर्चा आहे. यामध्ये गिरीश महाजन हे मात्र वेटिंग वरच राहिले, याची खंत त्यांच्या समर्थकांना आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com