Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजितदादांनी भर बैठकीतच दिली नेत्यांना तंबी; म्हणाले, 'पक्षाची सदस्य संख्या कमी झाली तर..'

Ajit Pawar warning to leaders News : नांदेड शहरात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

सरकारनामा ब्युरो

Nanded News : आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकत्रितपणे कामाला लागण्याची गरज आहे. निवडणूक जाहीर झाल्यांनतर कामाला लागून चालणार नाही. येत्या काळात पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. ज्या नेत्याच्या भागात सदस्य संख्या कमी होईल, त्या नेत्याचे कौतुक वेगळ्या पद्धतीने करण्यात येईल. त्याला सांगितले जाईल तुला आता विश्रांतीची गरज आहे, अशी तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरबैठकीमध्येच नेत्यांना दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा रविवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नरसी येथे उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत भास्कर पाटील-खतगावकर, मीनल खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेड शहरात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीला नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह मंत्री बाबासाहेब पाटील, नवाब मलिक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, संजय बनसोडे, आमदार राजू नवघरे, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे, माजी आमदार मोहन हंबर्डे यांची उपस्थित होते.

या बैठकीमध्ये त्यांनी पक्षातील नेत्यांना चांगलीच तंबी दिली. येत्या काळात पक्षाचा पुरोगामी विचार वाढवण्याचं काम चारही जिल्ह्यात करावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी एकत्रितपणे कामाला लागण्याची गरज आहे. आता कामाला सुरुवात करावी लागेल. महामंडळाचं वाटप जवळपास झालं आहे. 36 जिल्हे डोळ्यासमोर ठेवून ते वाटप होणार आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीही उपयोग नाही हे लक्षात ठेवा, अशी तंबी दिली.

महायुतीसोबत असलो तरी आपण आपली विचारधारा सोडली नाही, विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांच्यासोबत काम करत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी विकास कामाला अधिक प्राधान्य दिलं आहे. महायुतीत वाद होतील असे माझ्या पक्षाच्या प्रवक्त्याने, कार्यकर्त्यांनी बोलले नाही पाहिजे, ते बोलणं टाळलं पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

महायुतीने शब्द दिला आहे. पाच वर्षाचं हे सरकार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही. गरीब महिलांसाठी ही योजना आहे. ज्या महिलांचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी ही योजना चालूच राहणार आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT