Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी राग काढलाच! थेट सरकारला सुनावले; 'तुमची उणीदुणी...'

Eknath Khadse slams government News : विधिमंडळातही एकमेकांवर टीका केली जात असताना ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात नसल्याने यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ सुरू झाला आहे. याप्रकरणी, सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विधिमंडळातही एकमेकांवर टीका केली जात असताना ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात नसल्याने यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे.

महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी सध्या सभागृह सुरु आहे. शेतकऱ्यांचे, नोकरदारांचे, शेतमजूरांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. राज्यात अनेक चालीरिती संदर्भात उपाययोजनाचे प्रश्न आहेत. महागाईचे विषय आहेत, शेतकरी कर्जमुक्त, विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी हे अधिवेशन आहे. तुमची उनीदुणी अधिवेशनच्या बाहेर सोडविता आली असती. विधानसभेचा सर्व सदस्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. दिशा सालियन आणि औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी सामाजीक प्रश्न महत्वाचे आहेत. महिलांचे विषय, शेतकरी आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळा विधानसभेत चर्चा होते, असा सवाल एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला.

Eknath Khadse
BJP Minister Jaykumar Gore : माझ्या पाठीशी 'देवाभाऊ', कुणीही वाकडं करू शकत नाही; मंत्री गोरे यांचा विरोधकांना इशारा

नागपूरसारख्या शहरात बाहेरून काही जण येवून दंगल घडवितात. यात मालेगाव कनेक्शन जर असेल तर मालेगावकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे कृत्य करणाऱ्यांकडे पोलीसांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ही दंगल पुर्वनियोजित आहे तर सरकार नेमकं काय करत होते?, याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती. सरकार जर सांगत असेल की ही दंगल पूर्वनियोजीत होत आहे, तर हे गृह खात्याचे मोठे अपयश असल्याचा आरोप देखील यावेळी खडसे यांनी केला.

Eknath Khadse
Pratap Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांनी सगळच काढलं; म्हणाले, 'अशोक चव्हाणांसोबत असतो तर जिल्हा परिषदेवर गेलो नसतो...'

मोठ्या प्रमाणात ट्रॉलीमधून दगड आणले होते असे सांगितलं जात आहे तर, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस एलसीबी काय करत होते?, हा मोठा प्रश्न आहे. गृह खात्याने या प्रकरणाची काळजी घेतली असती तर कदाचित या दंगलीची तीव्रता कमी राहिली असती, असा सवालही खडसे यांनी केला आहे.

Eknath Khadse
MVA vs Mahayuti : अधिवेशनात महायुतीची स्टॅटर्जी ठरली वरचढ; शेवटच्या आठवड्यात तरी विरोधकांना सूर गवसणार का ?

दरम्यान, राज्यात दिशा सालियन, औरंगजेब या प्रश्नाऐवजी कितीतरी महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिलांचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह इतर प्रश्नांवर कितीवेळ विधानसभेत चर्चा होते? असा सवालही त्यांनी केला. केवळ अशा माध्यमातून महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित राहत असल्याची टीका त्यांनी केली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Eknath Khadse
Ajit Pawar-Jayat Patil Meeting : अजित पवार-जयंत पाटील भेटीवर पडळकरांचा मोठा दावा; म्हणाले, ‘सत्तेसाठी कितीही लाचार होण्याची जयंतरावांची तयारी...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com