Ajit Pawar News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परफाॅर्मन्स लोकसभा निवडणुकीत कमी राहिला असला तरी, त्यांची राज्यात ताकद वाढणार आहे. अजितदादांच्या राज्यसभेसह विधानपरिषदेच्या दोन जागा वाढण्याची शक्यता आहे. तसे राजकीय संकेत मिळाले आहेत. या जागांवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. नितीन पाटील, समीर भुजबळ आणि आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसोबत विधान परिषदेच्या दोन जागा देखील मिळणार आहेत. पियुष गोयल यांची रिक्त झालेली जागा सातारमधील नितीन पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेली जागेवर कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे.
याबाबत लवकर निर्णय होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. पियुष गोयल भाजपच्या तिकीटावर मुंबईतून लोकसभा निवडून आले आहेत. गोपाल शेट्टी यांचे तिकीट कापून गोयल यांनी निवडणुकीच्या मैदानात भाजपने आणले होते. काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा त्यांनी पराभव केला. राज्यसभेतील त्यांची जागा आता रिक्त झाली आहे. ती जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या वाटेला येण्याची शक्यता आहे.
प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेची निवडणूक 26 जूनला पार पडणार आहे. त्यामुळे ती जागा कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. या जागेसाठी समीर भुजबळ, आनंद परांजपे या दोघांची नावे समोर आहे. तसे ते इच्छुक असल्याची माहिती देखील मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ या जागेसाठी इच्छुक आहे.
तसेच आनंद परांजपे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अजितदादांची साथ दिली. शरद पवारसह त्यांच्याबरोबर असलेल्या दिग्गज नेत्यांना त्यांनी अंगावर घेतले. त्यामुळे त्यांना या रिक्त जागेवर प्रमोशन मिळणार का याकडे लक्ष लागले आहे. या जागेसाठी समीर भुजबळ आणि आनंद परांजपे यांच्यात रस्सीखेच दिसते. अजित पवार नेमकी कोणाला संधी देणार, काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चार जागा लढल्या होत्या. त्यात रायगड जिल्ह्यातील एकच जागा त्यांची निवडून आली. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचा परफाॅर्मन्स कमी राहीला. असे असून देखील अजित पवार गटाला महायुतीच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांवर अजित पवारांकडून कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे. तसेच प्रदेश कार्यकारिणीमध्ये या जागांबाबत खलबते देखील होऊ लागली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.