Sharad Pawar Ahmednagar Politics : पवारसाहेबांबरोबर गेलेल्या लंकेंना यश; आपलं काय होणार? अजितदादांच्या आमदारांना धास्तीनं ग्रासलं!

Sharad Pawar and Ajit Pawar Politics : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलेश लंके यांनी लोकसभेत यश मिळावले. यानंतर अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या नगर जिल्ह्यातील आमदार त्यांच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी धास्ती आणि चिंताग्रस्त झाले आहेत.
Sangram Jagtap Kiran Lahamte Ashutosh Kale
Sangram Jagtap Kiran Lahamte Ashutosh Kale sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics news : लोकसभा निवडणुकीला नीलेश लंके यांनी शरद पवारसाहेबांकडे जात तुतारी हातात घेतली आणि यश मिळालं. नीलेश लंके यांच्या यशानंतर मात्र अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी 'आपलं काय आणि कसं होणार', या धास्तीनं ग्रासलं आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबरोबर असलेले अनेक आमदार परतण्याची भाषा करत असल्याचे सांगून अजितदादांची धाकधूक वाढवली आहे.

नगर जिल्ह्यात शरद पवार यांनी अजित पवार यांना पहिला शह दिला तो म्हणजे, नीलेश लंके यांच्या रूपानं दिला. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर नगर जिल्ह्यातून आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे आणि नीलेश लंके यांनी अजितदादांची साथ केली. लोकसभा निवडणुकीत मात्र शरद पवार यांनी नीलेश लंके यांना बरोबर घेतले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना लागोपाठ चार वेळा यश मिळालेलं नव्हतं. त्यामुळे शरद पवार यांनी ही लढाई अस्तित्वाची केली होती. नीलेश लंके देखील निवडणुकीत शरद पवार यांच्या विश्वासाला खरे उतरले आणि अस्तित्वाची लढाई करत यश खेचून आणलं.

नीलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून यश मिळाल्याने नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चांगले दिवस आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडे असलेले आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नगर जिल्ह्यात अजितदादांबरोबर नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम जगताप, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आशुतोष काळे आणि अकोले मतदारसंघातील किरण लहामटे, असे तीन आमदार राहिले आहेत.

या तिन्ही आमदारांबरोबर असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नीलेश लंके यांच्या यशानंतर शरद पवार यांच्या सकारात्मक नेतृत्वाविषयी चर्चा रंगवल्या जात आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर शरद पवार आणि अजित पवार यांच्या बराच राजकीय संघर्ष पेटणार असे संकेत मिळू लागले आहे. अजित पवार यांच्याबरोबर असलेले आमदार वेगळ्या भूमिकेत असल्याचे देखील संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारणात अनेक उलथापालथ होणार असेच दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sangram Jagtap Kiran Lahamte Ashutosh Kale
Nilesh Lanke and Devendra Fadnavis : ...अन् नीलेश लंकेंनी देवेंद्र फडणवीसांकडे व्यक्त केली 'ही' अपेक्षा!

अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत म्हणावे, तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार यांनी आमदारांची तातडीचे बैठक घेत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. अजित पवार यांनी आमदारांना सूचना दिल्या असल्या, तरी महायुतीत त्यांच्या वाट्याला किती जागा येणार या प्रश्नाने विद्यमान आमदार धास्तावले आहेत.

राजकीय करिअरबाबत चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांबरोबर असलेले आमदार त्यांची कितपत साथ करतात, हा येणारा काळच स्पष्ट करेल. नगर जिल्ह्यातील आमदारांमध्ये देखील अस्वस्थता आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबरोबर असलेल्या अनेक आमदारांना परतायचे आहे, असे सांगून अजित पवार गटाची अस्वस्थता वाढवली आहे.

Sangram Jagtap Kiran Lahamte Ashutosh Kale
Ram Shinde Vs Sujay Vikhe : विखे-शिंदे दिलजमाईत 'मेख'च होती! शिंदेंची विखेंसाठी पळापळी 'फेक'च होती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com