Nitin Pawar : अजित पवारांना साथ दिलेल्या नितीन पवारांना विधानसभेसाठी मिळाली वॉर्निंग?

Dindori Lok Sabha 2024 Constituency Result : कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने लोकसभेत आमदार नितीन पवार यांना आसमान दाखवले आहे.
Nitin Pawar | Ajit Pawar
Nitin Pawar | Ajit PawarSarkaranama
Published on
Updated on

Nitin Pawar Vs Gavit News : अजित पवार गटाची साथ केलेल्या आमदार नितीन पवार यांची लोकसभा निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली आहे. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात 'माकप'च्या गावित 'फॅक्टर'ने आमदार पवार यांची झोप उडवली.

नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी मानली जाते. या निवडणुकीत माजी खासदार डॉ. भारती पवार (Bharti Pawar) आणि विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात महायुतीची जबरदस्त पीछेहाट झाली आहे. सत्ताधारी पक्षाला मतदारांनी दिलेली ही 'वॉर्निंग' म्हणून त्याकडे पाहिले जाते.

या निवडणुकीत डॉ. भारती पवार आणि आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्यातील भाऊबंदकीचा वाद मिटविण्यात आला होता. या कुटुंबाचे मनोमिलन झाल्याने कळवण-सुरगाणा मतदारसंघात भाजपला मोठी आघाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. पवार कुटुंबीयांच्या मनोमिलनाला मतदारांनी फारसे मनावर घेतले नाही.

या मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर पवार यांना 56 हजार 461 मते मिळाली. महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना एक लाख 14 हजार 134 मते मिळाली. त्यांना 57 हजार मतांची आघाडी आहे.

भारती पवार यांना गेल्या निवडणुकीत 65 हजार 545 मते होती. त्या तुलनेत दोन पक्षांची मदत आणि कुटुंबाचे मनोमिलन होऊनही त्यांच्या मतांत घट झाली आहे. त्यामुळे समर्थकांनाही धक्का बसला.

Nitin Pawar | Ajit Pawar
Hemant Godse News: कार्यकर्ते नसलेल्या दलबदलूंच्या फौजेने केला हेमंत गोडसे यांचा घात!

'इंडिया' आघाडीची बांधणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष घातले होते. 'माकप'चे जे.पी. गावित त्यात सामील झाले. गावित हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार असतील.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार पवार यांच्या विरोधात गावित यांचा अवघ्या दहा हजार मतांनी पराभव झाला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहता आगामी निवडणुकीसाठी आमदार पवार यांना इशाराच आहे.

आमदार पवार यांनी अजित पवार यांना साथ दिल्यानं मतदारांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे नेते शरद पवार यांच्या विषयाच्या सहानुभूतीने लोकसभेत आमदार पवार यांची मोठी पीछेहाट त्यांच्या समर्थकांनाही धक्का आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com