Maharashtra government schemes : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, सुरू केलेल्या योजनांना आताच्या भाजप महायुती सरकारमध्ये सुरूंग लागतो आहे, अशी परिस्थिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा एकनाथ शिंदेंना महायुतीकडून घेरलं जात असल्याचं चित्र अधिक गडद होऊ लागलं आहे. आनंदाचा शिधा ही योजना एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झाली होती. ती निधी अभावी बंद झाली आहे.
त्यापाठोपाठ आता आणखी एक शिंदेंनी सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना बंद आहे की, चालू आहे की, स्थगिती आहे, हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळे माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना आता चर्चेत आली आहे. या योजनेची घोषणा झाली. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद पडली की काय, अशी चर्चा आहे. दरम्यान, माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या काळातील बंद पडलेल्या योजनांची यादीच समाज माध्यमांवर शेअर केली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना 'माझी शाळा, सुंदर शाळा', ही योजना जाहीर करण्यात आली होती. डिसेंबर 2023मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना बंद पडल्याची चर्चा असली, तरी प्रशासकीय पातळीवर याबाबत कोणतीही अधिकृत अशी घोषणा झालेली नाही. पण योजनाच्या पहिल्या टप्प्यात नेमकं काय झालं, हे कळण्याच्या अगोदरच योजनाचा दुसरा टप्पा जाहीर झाल्याचे सांगितले जात आहे.
'माझी शाळा, सुंदर शाळे'ची राज्यात (Maharashtra government) चर्चा होती. या योजनेद्वारे सरकारी शाळांचे बळकटीकरणावर भर होता. या योजनेतील विजयी शाळांना लाखो रुपयांची बक्षीस जाहीर करण्यात आली होती. तसंच शाळांचा सर्वांगीण विकास, सौंदर्यीकरण, तंत्रज्ञान स्नेही शाळा करण्यावर भर होता. योजनेतील स्पर्धेद्वारे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर शाळांचा सन्मान होणार होता. आता याच योजनेची अंमलबजावणी यावर्षी सुरू झाली नसल्याने ही योजना देखील बंद पडली की काय, अशी चर्चा आहे.
दरम्यान, माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर महायुती सरकार योजना कशा बंद करत, याची पोस्ट शेअर केली आहे. यात बंद पडलेल्या योजनांची यादी देताना, 'माझी शाळा, सुंदर शाळा' या योजनेचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनाला खरचं ब्रेक लागला आहे का? अशी चर्चा राज्यात आहे.
दरम्यान, माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर महायुती सरकार योजना कशा बंद करत, याची पोस्ट शेअर केली आहे. यात बंद पडलेल्या योजनांची यादी देताना, 'माझी शाळा, सुंदर शाळा' या योजनेचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनाला खरचं ब्रेक लागला आहे का? अशी चर्चा राज्यात आहे.
अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये, 'सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र, यावर शब्द न बोलता 'महाशक्ती'च्या 'लाडक्या बुलेट ट्रेन'ची 'री' ओढताना आपल्याला दिसतील,' असा खोचक टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कोणत्या योजना बंद पडल्या आहेत, याची यादीच अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर शेअर केली आहे. अशा आठ योजनांचा त्यांनी संदर्भ दिला आहे. आनंदाचा शिधा- बंद!, माझी सुंदर शाळा - बंद!, 1 रुपयात पीकविमा - बंद!, स्वच्छता मॉनिटर - बंद!, 1 राज्य 1 गणवेश - बंद!, लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!, योजनादूत योजना - बंद! आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद! अशी यादीच शेअर करताना, योजना बंद करणारे हे 'चालू सरकार' आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.