Ajit Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Pawar Vs Bhujbal Video : छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? ठाकरेंच्या शिलेदाराने दिला सूचक इशारा, म्हणाले 'काहीही होऊ...'

Ajit Pawar Vs Chhagan Bhujbal ambadas danve Shivsena: छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमुळे भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Roshan More

Ambadas Danve News : मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. भुजबळांनी आपण काय निर्णय जाहीर केला नाही. मात्र, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'काहीही होऊ शकतं', असे म्हणत भुजबळ पक्ष सोडू शकतील, अशी शक्यता वर्तवली आहे.

माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, 'काहीही होऊ शकतं. कधी काय होईल याचा भरोसा काय देतो? भुजबळ ज्या प्रकारे व्यक्त होतायेत त्यामुळे ते अजितदादांसोबत राहतील की नाही, याबाबत सगळ्यांच्या मनात शंका आहे.'

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून ते छगन भुजबळ यांना देणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यावर बोलताना दानवे यांनी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हटले. तसेच भुजबळ यांची अजितदादांशी भेट होत नाही मात्र फडणवीसांना ते भेटतात यामध्ये सगळे समजून घ्यायला हवे, असे देखील सांगितले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलिसांना सापडत नाही, यावरून देखील दानवे यांनी संताप व्यक्त केला. 'मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही. तो कोणाशी कनेक्ट आहे हे संपूर्ण राज्याला माहीत आहे', असे म्हणत दानवेंनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

पालकमंत्री कधी घोषित होणार?

पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री कधी घोषित होणार असा प्रश्न प्रश्न विचारला जातो आहे. याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. त्यामुळे 26 जानेवारीच्या आधी पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT