Devendra Fadnavis : आत्ता सुट्टी नाही..!CM फडणवीसांची बदनामी भोवली;12 सोशल मीडिया यूझर्सला पोलिसांचा मोठा दणका

Chief Minister Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री फडणवीस यांची बदनामी करणाऱ्या व्हिडिओवर कारवाई, 12 सोशल मीडिया वापरकर्त्यां विरोधात एफआयआर
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने 12 सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या  व्हिडिओंच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार भारत भावला शिंदे (@Bs131B), शुद्धोधन सहजराव (@Suddhodhan74629), नागपुर कांग्रेस सेवादल (@SevadaINGP), सौरभ सिंह चौहान (@Sbchauhan0103), मुकेश लवले (@MukeshLavhale), suressh.kale, प्रसाद सालवी, वरद कांकी, अमोल कांबले, सैयद सलीम, THE SMART 230K और विष्णु भोटकर या सोशल मीडिया यूजर्स वर अर्धवट आणि तोडफोड करून व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे.

Devendra Fadnavis
Shrirang Barane : शिंदेंच्या खासदाराचे थेट फडणवीसांच्या गृह खात्यावर गंभीर आरोप

भारतीय दंड संहिता (BNS), 2023 चे कलम 353 (1) (b) माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, 2000 च्या कलम 67 अंतर्गत सीआर क्रमांक 22/2024 द्वारे, आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी जबाबदार असलेल्या सोशल मीडिया वापरकर्त्यांविरुद्ध कलम 356 (2), 192, 3 (5) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरी नक्षलवाद या बाबतच्या भाषणाचे व्हिडिओ एडिट करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना समोर आली आहे.

Devendra Fadnavis
Sansad Bhavan : संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले, नेमकं काय आहे कारण ?

याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सायबर सेलने अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिस आक्षेपार्ह व्हिडिओ, अश्लील साहित्याचे प्रकाशन आणि प्रसारण संबंधित आयटी कायद्याच्या कलमांखाली  तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com