Mumbai News : विधानपरिषदेतही महाविकास आघाडीचे आमदार संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध 5 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव नाकारण्यात आला. त्यावरूनही विरोधी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. विधानपरिषदेत विरोधक आमदारांनी सभात्याग करून ते सभागृहाबाहेर आले.
त्यातच बुधवारी कुठेही सभागृहाच्या कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर विश्वास ठराव मांडला. त्यांच्याकडे बहुमत आहे त्यामुळे मुद्दे रेटून त्यांनी गोऱ्हे बद्दलचा विश्वास ठराव मंजूर करून घेतला. आम्हाला कुठली बोलण्याची संधी त्यांनी दिली नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवला.
कामकाज सुरु असताना विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांना पदावरुन दुर करण्यात यावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यासोबतच तालिका सभापती चित्रा वाघ (Chita Wagh) यांच्यावर देखील एककलमी कार्यक्रमाचे गंभीर आरोप करत दोघांनाही पदावरुन हटविण्याची मागणी केली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदारांनी सहीचे पत्रही सभापतींना पाठवले आहे. त्यामध्ये "महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कासकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही, विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तरी मा. सभापती यांना पदावरुन दूर करण्यात यावे.", असा मजकूर दानवे यांनी दिलेल्या पत्रातून लिहिण्यात आला आहे
विरोधी पक्ष काळ्या फिती लावून कामकाज
लोकशाही असल्याने विरोधी पक्षाच्या एका जरी आमदाराला भूमिका मांडू दिली पाहिजे. सभागृहात मुख्यमंत्री होते, विधान परिषद अध्यक्ष होते. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांना बाजू मांडू दिली नाही. त्यामुळे, सभापती यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडला असून आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, गुरुवारी विधान परिषदेचे कामकाज देखील काळ्याफिती लावून करणार आहोत. उपसभापती जेव्हा सभापतीच्या खुर्चीवर बसतील तेव्हा एकही महाविकास आघाडीचा आमदार सभागृहात बसणार नाही, अशी भूमिका मविआच्या आमदारांनी घेतली आहे
दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सभागृहातील वादावर भूमिका मांडली. दोन्ही सभागृहात मनमानी कारभार सुरु आहे. महाराष्ट्राचे मणिपूर बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.