Opposition Leader News : ठाकरेंनी ताकद लावली पण या अधिवेशनात तरी विधानसभेचा विरोधी पक्षनेता मिळणार का?

Maharashtra Assembly News : या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विचार केला जाईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, अद्यापपर्यंत सकारात्मक पावले उचलण्यात आली नाहीत.
Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर दुसरीकडे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतके ही संख्याबळ गाठता आले नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विचार केला जाईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, अद्यापपर्यंत सकारात्मक पावले उचलण्यात अली नाहीत. त्यामुळे शेवटचे चार पाच दिवस शिल्लक असताना या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार की नाही याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला थोडेच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे, मात्र अजूनही त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यावर अद्याप कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला नाही.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Nagpur Violence : संतापजनक! नागपूर हिंसाचारात महिला पोलिसाचा विनयभंग? शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी अन् वर्दीवर हातही टाकला

येत्या 5 ते 6 दिवसात निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असे दोन अधिवेशन विधानसभा विरोधी पक्षनेते पदाविना जाणार आहेत. त्यामुळे विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात विरोधी पक्षनेते पदाचा चेंडू टाकला आहे. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदासाठीची पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. यावर लवकर निर्णय विधानसभा अध्यक्ष घ्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Eknath Shinde : नाराजी, शीतयुद्ध अन् आता शिंदेंचे 'पॅचअप'? सीएम फडणवीसांच्या बचावासाठी रुद्रावतार !

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या एवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तरच विरोधकांना हे पद मिळू शकते अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या या अर्थसंकल्पिय अधिवेशनात तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : फडणवीस 'चौकट' पूर्ण करणार; तीन 'पीए'नां आमदार केलं; चौथाही उतरवला रेसमध्ये...

विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतेही खास तरतूद नसल्याचं विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना उत्तर दिले आहे. विरोधी पक्ष नेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता तरी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार की हे अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय पूर्ण होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Devendra Fadnavis News : नागपुरात का पेटला वाद?, फडणवीसांनी सगळच सांगितलं

हिवाळी अधिवेशनानंतर मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या. त्यामध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली. महाविकास आघाडीतील घटक पक्षात हे पद संख्याबळानुसार ठाकरे गटाला मिळणार आहे. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे तीन पक्ष मिळवून देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बेहत घेतली होती.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
MLC Election : मोठी बातमी : विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले

या अधिवेशनापूर्वीच मातोश्रीत ठाकरेंच्या शिवसेना आमदारांच्या झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असा ठराव करण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देऊन विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेते पदासाठी गटनेते भास्कर जाधव यांची शिफारस करण्यात आली.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
MLC Election : भुजबळ, तटकरे, नितीन पाटलांच्या पाठोपाठ खोडकेंची घराणेशाही; इच्छुकांना संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी

गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन वेळेस भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची दोन वेळेस भेट घेतली. त्यावेळी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आजपर्यंत तरी कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे अधिवेशन संपेपर्यंत निर्णय होणार का ? याची उत्सुकता लागली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
MLC Election : मोठी बातमी : विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com