Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. यावेळी अमित शाह पुण्यातील जेडब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये मुक्कामी होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. या चार नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. यावेळी या नेतेमंडळीत येत्या काळात होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.
सोमवारी सकाळपासूनच शाह यांच्या भेटीसाठी नेतेमंडळींची रांग लागली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील शाह यांची भेट घेतली.
राज्यातील राजकीय घडामोडीना गेल्या आठवडाभरापासून वेग आला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख नेते दोन दिवसापासून पुण्यातच तळ ठोकून आहेत. सोमवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमित शहा यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत यावेळी चर्चा झाली असल्याचे समजते.
सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये अमित शाह यांची पहिल्यांदा मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना मदत, राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला (Shivsena) केंद्रात दोन मंत्रीपद हवे आहेत. एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद हवे असल्याचे समजते. यासाठी खासदार ओम राजेनिंबाळकरही देखील या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्रिपदावरून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे सूत्राकडून समजते. यावेळी शिवसेनेकडून मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.