Udayanraje Bhosale Amit Shah sarkarnama
महाराष्ट्र

Udayanraje : उदयनराजेंनी दिल्लीत केलेली मागणी अमित शाह महाराष्ट्रात येऊन पूर्ण करणार, 12 एप्रिलला रायगडावरुन मोठी घोषणा..?

Udayanraje Bhosale And Amit Shah News : महाराष्ट्रात लवकरच महापुरुषांचा अवमान वक्तव्य करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी नवा कठोर कायदा येणार असल्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे.

Deepak Kulkarni

Satara News : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात सातत्यानं महापुरुषांची बदनामी करणारी आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. सध्या अभिनेते राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरनं यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. या वक्तव्यांवरुन शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात लवकरच महापुरुषांचा अवमान वक्तव्य करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी नवा कठोर कायदा येणार असल्याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे.

सातारा जिल्ह्याचे खासदार व भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सोलापूरकर आणि कोरटकर विरोधात आक्रमक भूमिका घेतानाच थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे महापुरुषांचा अवमान वक्तव्य करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी यासंदर्भात कठोर कायदा करावा,अशी मागणी केली होती. याबाबत येत्या 12 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर खुद्द अमित शाह या नव्या कायद्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आता महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधातला नव्या कायद्याबाबत मीडियाशी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लवकरच यासंदर्भात कायदा होणार असून स्वत: गृहमंत्री अमित शाह या कायद्याबाबतची घोषणा करतील,असं खासदार उदयनराजे यांनी भाष्य केलं आहे.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त या महिन्यात 12 तारखेला किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे उपस्थित राहणार आहे.त्यांच्याद्वारेच या नव्या कायद्याची घोषणा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल. त्याचमुळे येत्या 12 तारखेला अमित शाह रायगडावरुन या कायद्यासंदर्भात घोषणा करतात का, हे पाहावे लागेल अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं होत असलेल्या अवमानावरुन महायुती सरकारवरच टीकेची तोफ डागली होती. या घटना घडत असताना सरकार काय बोळ्यानं दूध पितं का? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त दिली होती म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता.

उदयनराजेंनी यावेळी ठाम भूमिका घेताना विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्याविरोधात सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवून आणि तत्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास आमच्या संयमाचा कडेलोट होण्यापूर्वीच अधिकृतपणे प्रसिध्द करावा.तसेच अशा प्रवृत्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येणारा तसेच किमान 10 वर्षाची शिक्षा असणारा अजामीनपात्र विशेष कायदा पारित करण्याची मागणीही उदयनराजेंनी यापूर्वीच अमित शाहांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT