Congress On Waqf Bill: मोदी सरकारनं आणलेलं 'वक्फ दुरुस्ती विधेयक' दोन्ही सभागृहात मंजूर; काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Waqf Amendment Bill 2025 : वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधासाठी काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्याची संकेत मिळत आहे. सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Congress On Waqf Board .jpg
Congress On Waqf Board .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : मोदींच्या सरकारनं आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला आता लोकसभेसह राज्यसभेतही मंजुरी मिळाली आहे. दोन्ही सभागृहात मिळालेली मंजुरी हे मोदी सरकारचं तिसर्‍या टर्ममधलं आजपर्यतचं सर्वात मोठं यश मानलं जात आहे. पण अशातच काँग्रेसनं (Congress) या विधेयकासाठीची लढाई संपली नसल्याचे मोठे संकेत दिले आहेत.

वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधासाठी काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्याची संकेत मिळत आहे. सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. काँग्रेस लवकरच सर्वोच्च न्यायालयात वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या (Waqf Amendment Bill 2025) घटनात्मकतेला आव्हान देईल,अशी पोस्ट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करत दिली आहे.

जयराम रमेश पोस्टमध्ये म्हणतात,“काँग्रेस पक्षाने सीएए, माहिती अधिकार कायदा आणि निवडणूक आचार नियम यासारख्या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता काँग्रेस वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ च्या घटनात्मक वैधतेलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे,असेही काँग्रेस नेत्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Congress On Waqf Board .jpg
Raju Shetti : राजू शेट्टींची अजितदादांवर जहरी टीका; म्हणाले, ‘16 मिनिटे एसी बंद पडल्याचा गड्याला एवढा राग का?, लाज वाटली पाहिजे तुम्हाला....’

आम्ही भारतीय संविधानात असलेल्या समावेश असलेल्या तत्वांवर,तरतुदींवर आणि परंपरांवर मोदी सरकारच्या प्रत्येक हल्ल्याचा जोरदार विरोध करत राहणार असल्याचा इशाराही काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी X वर पोस्ट करत वक्फ दुरुस्ती विधेयकावर आपली भूमिका मांडली आहे. खर्गे पोस्टमध्ये म्हणतात, 'वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाबाबत देशात असे वातावरण निर्माण झाले आहे की हे विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Congress On Waqf Board .jpg
Devendra Fadnavis: फडणवीसांची मोठी कबुली; म्हणाले, 'मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून त्याचवेळी मंगेशकर हॉस्पिटलला संपर्क,पण...'

तसेच त्यांनी रात्री उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले, तेव्हा त्याच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली. हे का घडले? याचा अर्थ विधेयकात अनेक त्रुटी आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो की विविध पक्षांच्या विरोधाला न जुमानता, हे विधेयक मनमानी पद्धतीने आणले गेले. ये जिसकी लाठी, उसकी भैंस- म्हणत हे कोणासाठीही चांगले ठरणार नसल्याचंही खर्गे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com