Devendra Fadnavis: फडणवीसांची मोठी कबुली; म्हणाले, 'मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून त्याचवेळी मंगेशकर हॉस्पिटलला संपर्क,पण...'

Devendra Fadnavis On Tanisha Bhise Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची मुजोरी पाहायला मिळाली. दहा लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार अशी आडमूठी मागणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून करण्यात आली. मात्र दहा लाख रूपये भरले नाही म्हणून गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.
Devendra Fadnavis On Tanisha Bhise Case .jpg
Devendra Fadnavis On Tanisha Bhise Case .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाकडून उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांना प्राण गमवावा लागला.या दुर्दैवी घटनेनंतर मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.तर दुसरीकडे राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून आंदोलनं सुरू असतानाच रुग्णालयाची तोडफोडही तनिषा भिसे यांच्या मृत्युला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच जबाबदार असल्याचा आरोप भिसे कुटुबियांनी केला आहे. याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी मोठी कबुली दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी(ता.4)मीडियाशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये (Deenanath Hospital) घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी आहे. कुठेतरी असंवदेनशीलतेचा परिचय या घटनेतून पाहायला मिळतो आहे.खरंतर हे रुग्णालय अतिशय रेप्युटेड अशाप्रकारचं हॉस्पिटल आहे. लतादीदी यांनी पुढाकार घेऊन व मंगेशकर कुटुंबियांनी अनेक आपले रिसोर्सेस वापरुन हे रुग्णालय उभं केलं. पण तेथील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी अतिशय संवेदनशीलपणे प्रसुतीला आलेल्या महिलेला अॅडमिट करुन घेण्यास नकार दिल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

तसेच अधिकचे पैसे मागितले अशाप्रकारचा जो विषय समोर आला आहे.त्यामुळे लोकांमध्ये अतिशय चीड आहे. धर्मादाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्यपणे निभावली पाहिजे.अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. म्हणून याप्रकरणाच्या चौकशीसाठी हाय लेव्हलची कमिटी मी स्थापन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी दिली.

Devendra Fadnavis On Tanisha Bhise Case .jpg
Yogesh Kadam visit Beed : फरार कृष्णा आंधळेविषयी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं विधान...

तसेच स्थापन केलेली कमिटी या घटनेचा तपास तर करेलच,शिवाय अशा प्रकारच्या घटना घडूच नये म्हणन धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवता येईल,विशेष म्हणजे मेडिकल इमर्जन्सी असताना उपचाराला प्राधान्य कसे देण्यात येईल हे आपण पाहणार आहोत.मात्र,याठिकाणी पैशांची मागणी न करता गर्भवती महिलेवर उपचार करणे गरजेचं होते.पण यांसारख्या इथिक्सचं पालन रुग्णालयांकडून होतेय की नाही हेही पाहिलं जाईल असेही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षानेही याप्रकरणात लक्ष घालत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.पण दुर्देवानं रुग्णालयाकडून आमच्या कक्षाला योग्य तो प्रतिसाद मिळालाच नाही,अशी कबुलीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.

याचमुळे आम्ही या घटनेत कडक कारवाई करणार आहोत. याच अधिवेशनात आपण एक कायदा पारित केला आहे. लॉ आणि ज्युडीशिअरीकडून हा लागू होईल. त्याचवेळी फडणवीसांनी धर्मादाय रुग्णालयांनी किती पैसा खर्च केला कसा केला आणि जबाबदाऱ्यासंदर्भात नियंत्रण ठेवण्याचे काम करेल. रुग्णालय असे ताब्यात घेता येत नाही. मात्र, धर्मदाय आयुक्तांना अधिकार आहेत की, नेमकी काय कारवाई करावी असा निर्णय ते घेऊ शकतात,अशीही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis On Tanisha Bhise Case .jpg
Rohit Pawar vs Ram Shinde : 622 मतांचा गॅप भरून काढण्यासाठी राम शिंदेंची तयारी सुरु; तिकडे रोहित पवारांनी दिला दुसरा धक्का

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पुण्यातील घटनेवर भाष्य करत मोठे आदेश दिले आहेत.ते म्हणाले, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रुग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही अजित पवारांनी यावेळी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com