mol Mitkari accuses Laxman Hake of pressuring an OBC candidate to quit the election race, intensifying political tension. sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari VS Laxman Hake : अशोक चव्हाणांच्या लेकीची निवडणूक लक्ष्मण हाकेंनी केली सोपी? अमोल मिटकरींनी शेअर केली 'ती' ऑडिओ क्लिप

Laxman HakeAshok Chavan shreejaya chavan : भोकर मतदारसंघात ओबीसी नेते अ‍ॅड कुंटे ज्यांनी नामदेव आईलवाड यांच्यावर हाक्याचा कसा दबाव होता हे स्पष्ट सांगितले आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Roshan More

OBC Politics : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मिटकरी यांनी आपल्या ट्विटरवरून एक लक्ष्मण हाकेंची ओडिओ क्लिप शेअर करत भोकर मतदारसंघातील उमेदवाराला माघार घेण्यासाठी हाकेंनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण या निवडणूक लढत होत्या.

या ऑडिओ क्लिप लक्ष्मण हाके यांनी फोन करणारी व्यक्ती त्यांच्या दबावातून प्रहारच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे म्हणत आहे. तर, हाके हे आपण दबाव आणू शकतो का? असा प्रतिप्रश्न करत आहे. मिटकरी यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यतेची पुष्टी 'सरकारनामा' करत नाही.

मिटकरी यांनी म्हटले की, सदर ऑडिओ ही भोकर मतदारसंघातील आहे.याच मतदारसंघात एका ओबीसी बांधवाचा राजकीय बळी देऊन हाक्याने आर्थिक देवाण-घेवाण केली आणि अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. आता या मतदार संघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लागे.

हाक्याची औकात...

भोकर मतदारसंघात ओबीसी नेते अ‍ॅड कुंटे ज्यांनी नामदेव आईलवाड यांच्यावर हाक्याचा कसा दबाव होता हे स्पष्ट सांगितले आहे. हाक्या तुझी हीच लायकी व औकाद आहे, असे देखील मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. २०१४ विधानसभेत (५२७)२०१९ च्या विधानसभेत (२८७) २०२४ च्या लोकसभेत ५५०० हजार मते देऊन जनतेनेच तुला तुझी औकात दाखवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जातीच विष पेरू नकोस, असे देखील मिटकरी यांनी म्हटले आहे.

अजितदादाच्या लेकाची लायकी बघणार?

मिटकरी यांनी हाकेंना पडलेल्या मतावरून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना हाके म्हणाले की, अजित पवारांचा पोरगा पार्थ हा देखील निवडणूक पराभूत झाला होता. मग त्याच्या मतावरून त्याची लायकी शोधायची का? अजित पवार पोल्ट्री फाॅर्मवाले आहेत त्यांनी ओबीसींचा निधी अडवला असा आरोप देखील हाके यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT