Amol Mitkari Vs Bajrang Sonwane
Amol Mitkari Vs Bajrang Sonwane Sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari Vs Bajrang Sonwane : 'बाप्पा, दादांनी मला ऑपरेटर बनवलं तर मी..' ; मिटकरींनी सोनवणेंना पुन्हा डिवचलं!

Mayur Ratnaparkhe

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीने महायुतीच्या तुलनेत जास्त जागा जिंकल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकमेकांवर निशाणा साधणं सुरू आहे.

दरम्यान महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे बीडमधील खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं मिटकरींनी सांगून राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती.

ज्यावर बजरंग सोनवणे यांचंही म्हणणं समोर आलं. त्यांनी अमोल मिटकरींचा दावा फेटाळत, त्यांच्यावरच निशाणा साधला. मिटकरी हे अजितदादांच्या (Ajit Pawar) बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा संतप्त सवाल करत सोनवणे यांनी मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे.

यानंतर आता अमोल मिटकरींनीही बजरंग सोनवणे(Bajrang Sonwane) पुन्हा एकदा डिवचल्याचं दिसत आहे. 'बप्पा म्हणले मिटकरी देवगिरीवरचा ऑपरेटर आहे.! बप्पा, दादांनी मला ऑपरेटर बनवलं तर मी माझं भाग्य समजेल.पण बप्पा ऑपरेटर बनल्यावर किती फोन खणाणले याचे कॉल डिटेल्स पण बाहेर येतील. आज कुणाचा फोन खणाणला आत्ता सांगत नाही. मात्र तुमचा कालचा आवाज उपस्थित बिडकरांनी पण योगायोगाने ऐकलाय.' असं मिटकरींनी ट्वीट्द्वारे म्हटलं आहे.

बजरंग सोनवणे नेमकं काय म्हणाले होते ? -

'अमोल मिटकरी हे कोण आहेत ? हे दादाच्या बंगल्यावर एखादे ऑपरेटर आहेत का ? ते नेमके कोण आहेत ? हे मला माहित नाही, त्यामुळे विचारलं पाहिजे, अमोल मिटकरी हे कोण आहेत. दादाच्या बंगल्यावर कोणाचा फोन आला, त्यांचे रेकॉर्ड कोणाकडे असू शकते तर ते ऑपरेटरकडे, म्हणून मी म्हटलं मिटकरी हे ऑपरेटर आहेत का ?.' असे सोनवणेंनी म्हटलं होतं.

शरद पवार यांचे 8 खासदार निवडून आले आहेत. जर माझ्यासारखा एखादा खासदार इकडून निवडून येऊन तिकडे गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच पण माझ्या घरात माझे वडील देखील मारतील, बायको नाश्ता देणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT