Bajrang Sonwane on Manoj Jarange : 'जरांगेंच्या उपोषणाची दखल घेण्याची सरकारला सूचना करा' ; बजरंग सोनवणेंची राज्यपालांकडे मागणी!

Manoj Jarange hunger strike : 'या आंदोलनाची शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर...'असंही खासदार सोनवणे यांनी म्हटले आहे.
Bajrang Sonwane on Manoj Jarange
Bajrang Sonwane on Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Bajrang Sonawanes letter to the Governor : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकारला दखल घेण्याची सूचना करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्यपालांकडे केली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी (ता. 12) राज्यपालांना निवेदन पाठविले आहे.

मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी शनिवार (ता. 8) पासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. पाच दिवसांपासून मनोज जरांगे यांनी अन्न, पाणी त्यागल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांविषयी महाराष्ट्र सरकारची उदासिन भूमिका दिसत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

Bajrang Sonwane on Manoj Jarange
Manoj Jarange Patil : ठाकरेंच्या खासदाराचा जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा, थेट राज्यपालांनाच लिहिलं पत्र

या आंदोलनाची शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचेही पत्रात म्हटले आहे. या विषयात राज्यपालांनी स्वत: लक्ष घालावे व राज्य सरकारला उपोषणाची दखल घेण्याची सूचना करावी, अशी मागणी बजरंग सोनवणे(Bajrang Sonwane) यांनी केली.

खासदार संजय जाधव यांचीही राज्यपालांकडे मागणी -

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ते पुन्हा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटी येथे बसले आहेत. सध्या त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी जरांगे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे.

Bajrang Sonwane on Manoj Jarange
MP Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट ; म्हणाले, 'राजकारण म्हणून पाहू नका...'

अशातच आता ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवाय जरांगे यांची तब्येत खालावण्याआधी ताबडतोब सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी राज्यपालांकडी केल्याचं सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com