Bajrang Sonwane Vs Amol Mitkari : बीडच्या 'बाप्पा'नं मिटकरींना झापलं; 'मी मरेपर्यंत पवारांसोबतच; पण त्यांनी एखादा ग्रामपंचायत...'

NCP Sharad Pawar Vs NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Bajrang Sonwane Vs Amol Mitkari
Bajrang Sonwane Vs Amol Mitkari Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा गुलाल उधळणाऱ्या बजरंग सोनावणे जायंट किलर ठरले होते. त्यांच्या विजयाची राज्यभर चर्चा झाली. त्याच बजरंग सोनावणेंविषयी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी (ता.11) एक ट्विट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

'बीडच्या बाप्पाचा दादांना फोन' असे ट्विट करणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी चांगलाच पानउतारा केला. त्यांनी एखादा ग्रामपंचायत सदस्य तरी निवडुन आणावा, असा टोला लगावत आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू, असे स्पष्ट केले.

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'बीडच्या बाप्पाचा दादांना फोन' अशा आशयाचं ट्विट आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या मातब्बर नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

निवडणुकीत अजित पवार यांनी केलेल्या टिकेलाही बजरंग सोनवणे यांनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, मिटकरींच्या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातही खासदार फुटीची भीती आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या प्रकरणावर बजरंग सोनवणे(Bajrang Sonwane) यांनी स्पष्टीकरण देत, मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असं स्पष्ट केलं.

Bajrang Sonwane Vs Amol Mitkari
Shivsena VS Congress : रामटेकवरुन आघाडीत बिनसलं? ठाकरे गटाने ठोकला दावा तर काँग्रेसही आग्रही

अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत बोलावं. असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा, असा टोलाही लगावला.

'मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो. ते असा संभ्रम का पसरवत आहेत, हे त्यांनाच विचारायला हवं. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहेत. या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात, ते तुम्ही राजकारणात आणताय. हे मिटकरी अतिशय चुकीचं करत असल्याचं सोनावणे म्हणाले.

मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय, मला माहित नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा, असा चिमटा काढत बजरंग सोनवणे यांनी मिटकरींचा हिशेब चुकता केला.

Bajrang Sonwane Vs Amol Mitkari
Nana Patole : नाना पटोलेंनी सांगितला, पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न; 'नीट', 'एक्झिट पोल आणि शेअर मार्केट'...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com